Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका, लसीकरणाशिवाय वारक-यांना पंढरीत प्रवेश नको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका, लसीकरणाशिवाय वारक-यांना पंढरीत प्रवेश नको

Surajya Digital
Last updated: 2021/06/13 at 9:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर / सोलापूर : आषाढी वारी यंदा पायी होणार नसून मानाच्या दहा पालख्या एसटीबसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच दिला होता. यात आता पालखी सोहळ्यासोबत येणारे महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे. अशाच पद्धतीची भूमिका प्रदक्षिणा मार्गावरील कुटुंबेही व्यक्त करीत आहेत.

सोलापूर : महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल, लग्नसोहळ्यासाठी 100 जणांना तर हॉटेल आणि चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी #surajyadigital #सुराज्यडिजिटल #सोलापूर #solapur #निर्बंध #शिथिल #marriage #cinemahall pic.twitter.com/fv1L7l0Fzd

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका पंढरपूर परिसराला बसल्याने गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही प्रातिनिधिक स्वरूपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूरमधील नागरिकांची आहे. संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या आतल्या बाजूस आहे. यामुळे येणारे वारकरी लसीकरण करून आले तर नागरिकांना धोका कमी निर्माण होईल, अशी भूमिका नगराध्यक्ष साधना भोसले यांनी मांडली.

सोलापूर जिल्हा उद्यापासून पूर्ण अनलॉक, सर्व व्यवहार आता सुरळीत होणार #solapur #सोलापूर #Unlock #अनलॉक #surajyadigital #व्यवहार #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/20117sqoPk

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अजूनही पंढरपूरमध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण कमी झालेले नाहीत. रोज नवीन रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. आतापर्यंत पंढरपूरमध्ये २४ हजार ७३१ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून सध्या ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पंढरपुरात एकूण ४८० जणांचा मृत्यू झाला आहे.

अक्कलकोटमध्ये भरदिवसा तरुणाचा निघृण खून; पाच गंभीर जखमी, सहाजणांना अटक
https://t.co/xghJ8VWOID

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे ४१९ रुग्ण सापडले असून त्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांत अजूनही या दोन्ही आजारांची भीती कायम आहे. सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेदांत आणि व्हिडिओकॉन या भक्त निवासात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे तर मंदिराजवळील संत गजानन महाराज मठही शहरातील कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे.

* पंढरपूरच्या नागरिकांचाही विचार करावा

वारकऱ्यांच्या निवासासाठी बनविलेला ६५ एकरावरील भक्ती सागर हा निवासतळही कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर साठी वापरला जात आहे. अशावेळी पालखी सोहळ्यासोबत येणारे वारकरी यंदा दशमी ते द्वादशी असा ६ दिवस मुक्काम करणार असल्याने नागरिकांची भीती वाढली आहे.

विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली, बघता – बघता कार बुडाली, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/mevWWCQT4p

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

गेल्यावर्षी दशमीला आलेल्या पालख्या द्वादशीला परत फिरल्या होत्या. यंदा मात्र वारकऱ्यांची नाराजी नको म्हणून सरकारने दोन दिवसांचा मुक्काम परंपरेप्रमाणे पौर्णिमेपर्यंत वाढवला आहे. आषाढी सोहळा हा पंढरपुरातील नागरिकांना दिवाळीपेक्षा मोठा असला तरी यंदाची परिस्थिती गेल्यावेळीपेक्षा भीषण असल्याने वारीचे नियोजन करताना पंढरपूरच्या नागरिकांचाही विचार करावा, अशी मागणी नगराध्यक्षांनी केली आहे.

विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली, बघता बघता कार बुडाली
मुंबई : घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला याच्यापाठीमागे रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहिरीवर हा प्रकार घडला. #car #mumbai #कार #घाटकोपर #विहिर #पाऊस #rain pic.twitter.com/9bUNFaEFHF

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

You Might Also Like

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस

शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित

सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब

वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा

TAGGED: #corona #bigblow #Warak #doesn't #enter #Pandharpur #without #vaccination, #कोरोना #दुसऱ्यालाटेचा #मोठाफटका #लसीकरणाशिवाय #वारक-यांना #पंढरीत #प्रवेशनको
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ड्रोन करतील औषधांची घरपोच डिलीव्हरी
Next Article वेळापूरकरांना मूसळधार पावसाने काढले झोडपून, सलग दोन तास पाऊस

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?