Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैराग नगरपंचायत : नगराध्यक्षपदी डोळसे तर उपनगराध्यक्षपदी भूमकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वैराग नगरपंचायत : नगराध्यक्षपदी डोळसे तर उपनगराध्यक्षपदी भूमकर

Surajya Digital
Last updated: 2022/02/18 at 9:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

बार्शी : वैराग नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदी सुजाता संगमेश्वर डोळसे तर उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे निरंजन भूमकर यांची आज शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीकरता आज झालेल्या विशेष सभेत या निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी केली. डोळसे या वैराग ग्रामपंचायतीच्या शेवटच्या सरपंच होत्या. त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळातच ग्रामपंचायतच्या नगरपंचायतीतील रुपांतरणाची प्रारंभिक प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर अस्तितत्वात आलेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी निवड होण्याचा योग देखील त्यांनाच लाभला.

त्या ग्रामपंचायतीच्याही पहिल्या महिला सरपंच होत्या आणि नगरपंचायतीच्याही पहिल्या महिला नगराध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे त्या भाग्यवान ठरल्या.  नूतन पदाधिकार्‍यांची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. Vairag Nagar Panchayat: Dolse as the Mayor and Bhumkar as the Deputy Mayor

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील डोळसे या एकमेव नगरसेवक आहेत. त्यामुळे आरक्षणाची घोषणा झाल्यानंतरच त्यांचे नगराध्यक्षपद नक्की झाले होते.

आज त्याच्यावर औपचारिक शिक्कामोर्तब झाले. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली दोन तृतीयांश बहुमताने सत्ता आली आहे. नगराध्यक्षपद आरक्षित झाल्यामुळे उपनगराध्यक्षपद भूमकर स्वीकारणार हे स्पष्ट होते. त्यामुळे दोन्हीही निवडी अपेक्षेप्रमाणे झाल्या आहेत.

यावेळी नगरसेविका तृप्ती भूमकर, नगरसेविका राणी आदमाने, जयश्री घोडके, अनुप्रिया घोटकर, पद्मिनी सुरवसे, आसमा मिर्झा, गुरुबाई झाडमुके, नागनाथ वाघ, अतुल मोहिते, अजय काळोखे, अक्षय ताटे आदी नगरसेवकांसह मृणाल भूमकर, बाळासाहेब भुमकर, तालुकाध्यक्ष राजकुमार पोळ, मारूती ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. पीठासीन अधिकारी अरुणा गायकवाड यांना मुख्याधिकारी विना पवार यांनी निवड प्रक्रियेस सहाय्य केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #वैराग #नगरपंचायत #नगराध्यक्षपदी #डोळसे #उपनगराध्यक्षपदी #भूमकर, Vairag Nagar Panchayat: Dolse as the Mayor and Bhumkar as the Deputy Mayor
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतसारा न भरल्यास शेत जमीन सरकारची होणार
Next Article २००८ अहमदाबाद ब्लास्ट; ३८ दोषींना फाशी, वाचा सविस्तर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?