Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईन फाइलमध्ये – इलॉन मस्क
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईन फाइलमध्ये – इलॉन मस्क

admin
Last updated: 2025/06/06 at 8:10 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 6 जून (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यातील कट्टर मैत्री आता उघड शत्रुत्वात बदलली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांना सरकारी करार आणि अनुदान देणे बंद करण्याची धमकी दिली.त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाशी संबंधित एका पोस्टचे समर्थन केलं.तसेच मस्क यांनी ट्रम्प यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईन फाइलमध्ये असल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांच्यातील वाद वाढत चालला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केली आहे. तसेच इलॉन मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये मस्क यांनी दावा केला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आहे, म्हणूनच त्या जाहीर केल्या जात नाहीत. “खरोखरच मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे.. डोनाल्ड ट्रम्प एपस्टाईन फाइल्समध्ये आहेत. ते सार्वजनिक न होण्याचे खरे कारण हेच आहे. तुमचा दिवस चांगला जावो, डीजेटी! भविष्यासाठी ही पोस्ट लक्षात ठेवा. सत्य बाहेर येईल,” अशी एक्स पोस्ट इलॉन मस्क यांनी केली आहे. यासोबत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची आणि त्यांच्या जागी जेडी व्हान्स यांना अध्यक्ष बनवण्याची मागणी करणारी पोस्टही शेअर केलीय.

मस्क यांनी आरोप केलेला जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर होता ज्याने अब्जाधीशांसाठी निधी जमवून अफाट संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. या काळात त्याने माजी अमेरिकन राष्ट्रपती, ब्रिटिश राजघराणे आणि प्रमुख हॉलिवूड सेलिब्रिटींसह महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण केले होते.जेफ्री एपस्टाईनचे नाव अमेरिकेत एक कुख्यात गुन्हेगार म्हणून नोंदवले गेले आहे.एपस्टाईन हा मुलांचे लैंगिक शोषण आणि तस्करी करणारा गुन्हेगार आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलांना वरिष्ठ राजकारणी, व्यावसायिक आणि सेलिब्रिटींकडे नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर या मुलांचे तिथे लैंगिक शोषण करण्यात आले. एवढेच नाही तर डझनभर महिलांनी एपस्टाईन गंभीर आरोप केले आहेत.

२००५ मध्ये एका कुटुंबाने तक्रार केली होती की एपस्टाईनने त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर फ्लोरिडा पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात धक्कादायक खुलासे झाले. एपस्टाईनने एकूण ३६ मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले. २००८ मध्ये त्याला दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा सुनावण्यात आली. मात्र १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो बाहेर आला होता. २०१९ मध्ये पुन्हा अटक झाल्यानंतर ऑगस्टमध्ये त्याने अमेरिकन तुरुंगात आत्महत्या केली ज्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबवावा लागला.

दरम्यान, जेफ्री एपस्टाईनच्या गुन्ह्यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. तपासादरम्यान समोर आलेले कागदपत्रे, संपर्क यादी, कॉल रेकॉर्ड, चॅट, व्हिडिओ, त्याच्या सहकाऱ्यांची आणि क्लायंटची नावे एपस्टाईन फाइल्समध्ये नोंदवली गेली आहेत. अमेरिकन सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामध्ये अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे आहेत. अशातच मस्क यांनी ट्रम्प यांचे नाव या फाईलमध्ये असल्याचा आरोप केला आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युवा स्वाभिमानाचे इच्छुक भाजपकडून लढणार – आमदार रवी राणा
Next Article मुंबईसह केरळमध्ये ईडीची छापेमारी

Latest News

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?