अहिल्यानगर दि. 31 मार्च (हिं.स.) :- आपली पाल्ये गुणी आहेत. त्यांच्या प्रागतीच्या बाबतीत काही कमी असेल तर शिक्षकांशी संवाद साधुन कशी अधिकची प्रगती साधता येईल याचा प्रयत्न करावा.मात्र त्यांची तुलना इतर मुलांशी कधीही करू नका. आपण कठीण परीश्रमाने सध्याच्या परीस्थित आला आहात. त्यांच्या पुढे परीश्रमाचा आदर्श ठेवा व त्यांच्यावर होत असलेल्या शैक्षणिक खर्चाचा हिशेब त्यांच्या समोर मांडू नका, असा सल्ला अमेरिकन सायकॉलॉ जिकल असोसिएशनच्या सदस्या, लेखिका, मानसशास्त्राच्या प्राद्यापिका, अशा अनेक बिरूदावलींच्या मानकरी व प्राचार्या डॉ. सुषमा भोसले यांनी दिला.
संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनात प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ. भोसले पालकांसमोर बोलत होत्या. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, निकिता कोल्हे, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे , हेड ऑफ इन्स्टिटयूट सर्विस प्रकाश जाधव, एक्झिक्युटिव्ह प्रिन्सिपाल रेखा पाटील प्राचार्या शैला झुजारराव, आदी उपस्थित होते. पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती.प्रारंभी प्राचार्या झुंजारराव यांनी वार्षिक अहवाल सादर करत विद्यार्थ्यांनी वर्षभर विविध क्षेत्रात स्थापित केलेल्या कीर्तिमानांबद्धल पालकांकडून टाळ्यांचा वर्षाव मिळविला.डॉ. भोसले पालकांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की आपल्याा मुलांचे वागणे हे आपल्या वर्तणुकीचे प्रतिबिंब असते. म्हणुन बोलणे आणि कृती यांच्यात समन्वय ठेवावा. मुलं अनुकरणिय आतात.
त्यांना चांगला माणुस बनविण्यासाठी प्रथम तुम्ही चांगला माणुस बना. विद्यार्थ्यांंनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर व्यक्त होताना त्यांनी चिमुरड्यांचे कौतुक केले, तसेच शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचेही अभिनंदन केले.अमित कोल्हे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनातून २०१२ साली अगदी थोड्या विद्यार्थी प्रवेशातून स्कूलची वाटचाल सुरू झाली व आज भरगच्च प्रवेश क्षमतेसह अगदी राष्ट्रीय पातळीवर देखिल आपले विद्यार्थी विजयश्री खेचुन आणतात.यात पालकांनी टाकलेला विश्वास महत्वपुर्ण आहे. संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांची ग्रामीण मुलांना कोणत्या ही अद्ययावत ज्ञानाची कमतरता पडली नाही पाहीजे, अशी तळमळ असते.त्यानुसार नितिन कोल्हे व संचालीका डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतुन तयार केलेल्या कृती आराखड्या नुसार स्कूलची वाटचाल सुरू आहे.
यानुसार दैनंदिन काम काजामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा अंतर्भाव करण्यात आला आहे. सध्या यानुसार कोडींग, रोबोटिक्स विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत असुन पुढील वर्षापासून आर्टिफीशियल इंटिलिजंस शिकविण्यात येणार आहे. तसेच पाया प्रशिक्षणही (फाऊंडेशन ट्रेनिंग ) देण्यात येणार आहे. १० वी व १२ वीचे शिक्षण पुर्ण केल्यावर पुढील शैक्षणिक वाटा कोणत्या निवडाव्या, याचा पालक व विद्यार्थी यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो. याचे उत्तर शोधण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने नेमलेले करीअर कौन्सेलर स्कूलमध्ये येतात. पालकांनी आपल्या पाल्यांबाबत कोणतीही काळजी करू नये, संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थी भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे, असे व्यवस्थापनाचे प्रयत्न असुन ते सत्यात येईल, असा आशावाद कोल्हे यांनी व्यक्त केला.