Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामात टक्केवारीचे राजकारण चालू, अधिवेशनात शंका उपस्थित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामात टक्केवारीचे राजकारण चालू, अधिवेशनात शंका उपस्थित

Surajya Digital
Last updated: 2022/12/22 at 12:05 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ हिवाळी अधिवेशनामध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केली शंकास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● विमानतळासाठी राजकारण नको, बोरामणीसाठी प्रयत्न हवे□ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आ. शिंदे□  दुहेरी जलवाहिनीचे काम होणे गरजेचे, आवाज उठवू : आमदार देशमुख

□ हिवाळी अधिवेशनामध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केली शंका

 

सोलापूर : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम बंद असल्याबाबत आवाज उठवला आहे. मागील पाच वर्षापासून या प्रकल्पाचे वारंवार टेंडर काढून टक्केवारीचे राजकारण चालू असल्याची शंका त्यांनी व्यक्त करत त्वरित हा प्रकल्प पूर्ण करणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. Praniti Shinde Deshmukh has doubts about the percentage politics in the work of Solapur double aqueduct

 

आ. शिंदे म्हणाल्या, स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध विकास कामे हाती घेण्यात आलेले आहेत. त्यातील प्रामुख्याने महत्त्वाचे काम सोलापूर ते उजनी दुहेरी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे आहे. परंतु मागील पाच वर्षापासून या प्रकल्पाचे वारंवार टेंडर काढून टक्केवारीचे राजकारण चालू असल्याची बाब समोर येत आहे.

 

हा प्रकल्प सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा असल्या कारणाने त्याचे काम लवकर होणे क्रम प्राप्त आहे. पण तसे न होता यामध्ये वर्क ऑर्डर दिल्यानंतरही काम करणाऱ्या कंपनीस हेतू पुरस्कार पाईपलाईनचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याकरिता कोणतेही वैद्य कारण प्रशासनाकडे नाही तसेच याकरिता कोणतीही न्यायालयीन स्थगिती नाही. ही बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी यांना पिण्याच्या पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विकास कामे करण्याकरीता रस्ता खोदण्यात येतो, परंतु दुरुस्त करण्यात येत नाही. यामुळे शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

झोपडपट्टी भागामध्ये सार्वजनिक नळ बंद करण्याची मोहीम मागे घ्यावी, नवीन नळ कनेक्शन सामूहिक रित्या देण्याबाबत कोटेशन रकमेमध्ये हफ्ते पाडून द्यावेत, रेल्वेच्या जमिनीवर ज्या झोपडपट्टी आहेत त्यांना अधिकृत करण्याकरीता एक धोरणात्मक निर्णय घ्यावा, या भागातील नागरिकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली आहे.

 

शासनाने रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्या जागेवर किंवा पर्यायी जागेवर करावे, अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत ड्रेनेज लाईन खराब झाली आहे. त्याच्या दुरुस्तसाठी महापालिकेला खासबाब म्हणून निधी द्यावा, आदी मागण्याही आ. शिंदे यांनी केल्या.

 

● विमानतळासाठी राजकारण नको, बोरामणीसाठी प्रयत्न हवे

सोलापूर शहरातील ज्वलंत प्रश्न बोरामणी विमानतळाचा आहे. बोरामणी विमानतळाकरीता आपण राजकरण न करता सोलापुरामध्ये विमानतळ झाले पाहिजे, बोरामणी विमानतळ पूर्णपणे अधिकृतरित्या झालेले आहे. सगळे मिळून बोरामणी विमानतळाकरीता मा. ज्योतीरादित्या सिंधीया यांच्याकडे जावून लवकरात लवकर विमानतळ विकसित होऊन कार्यरत होण्याकरिता प्रयत्न करावे, असेही आ. शिंदे यांनी म्हटले आहे.

 

□ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आ. शिंदे

 

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरिता अत्यंत महत्वाचा असून तो तातडीने पूर्ण केला पाहिजे. हे काम सुरू करावे, याबाबत आपण अधिवेशनात बोलणार आहोत, असे आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या. या जलवाहिनीचे काम थांबविण्याकरीता कोणत्याही न्यायालयाने स्थगिती अथवा सूचना दिलेल्या नसल्याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे काम थांबविण्याची गरज नसताना देखील वेळकाढूपणा चालू आहे. काम थांबविणे म्हणजे शहराच्या विकासाकामांमध्ये अडथळा आणला जात आहे. आता अधिवेशन सुरू झाले आहे, आपण याप्रश्नी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे आ. शिंदे म्हणाल्या.

 

□  दुहेरी जलवाहिनीचे काम होणे गरजेचे, आवाज उठवू : आमदार देशमुख

 

सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता आवश्यक असलेल्या उजनी ते सोलापूर (दुहेरी) समांतर जलवाहिनीचे काम थांबविले आहे. हे काम कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याबाबत आपण चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

 

 

दुहेरी जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरिता अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरकरांना दोन, तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मुळात ही योजना भाजपच्या काळात मंजूर झाली आहे. ही योजना पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. याबाबत आपण नागापूर अधिवेशनात निश्चित आवाज उठवणार असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #PranitiShinde #Deshmukh #doubts #percentage #politics #work #Solapur #doubleaqueduct, #सोलापूर #दुहेरी #जलवाहिनी #काम #टक्केवारी #राजकारण #अधिवेशन #शंका #उपस्थित #प्रणितीशिंदे #देशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माळशिरस | चार महिन्याअगोदरच झाले लग्न, विवाहितेचा गळा दाबून खून
Next Article सोलापूरच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिनपुत्र अर्जुन तेंडूलकर खेळणार ?

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?