Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

admin
Last updated: 2025/06/27 at 4:16 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 27 जून (हिं.स.)। उबाठा कामगार सेनेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रशांत काकडे यांनी शुक्रवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, सुहास माटे उपस्थित होते. डॉ. काकडे यांच्यासमवेत कामगार सेनेच्या शेखर पवार, वर्षा माळी, विजय हरिहर, बाबुलाल पुजारी या कार्यकर्त्यांनी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते गिरीश मसुरकर यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

श्री. चव्हाण यांनी सांगितले की डॉ. काकडे हे कामगार क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विमानतळ सेवा क्षेत्रात विदेशी कंपन्यांना बंदी करावी, अशी मागणी डॉ. काकडे यांनी पूर्वीपासून केली होती. मात्र उबाठा सेनेने या मागणीकडे दुर्लक्ष केले. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने विमानतळ सेवा क्षेत्रात परदेशी कंपन्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला. कामगार हितासाठी मोदी सरकार व फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे डॉ. काकडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगार हितासाठीच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यासाठी भाजपा संघटना पूर्णपणे प्रयत्न करेल, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. काकडे हे उबाठा सेनेत गेली 35 वर्षे विविध पदावर कार्यरत होते. शिक्षण, कामगार क्षेत्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. पक्षाच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

—————

You Might Also Like

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
Next Article आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश
देश - विदेश June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?