Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डॉ. वळसंगकर प्रकरणाचं काय झालं? ‘खाकी’ वर्दी आता ‘हे’ म्हणतेय !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

डॉ. वळसंगकर प्रकरणाचं काय झालं? ‘खाकी’ वर्दी आता ‘हे’ म्हणतेय !

admin
Last updated: 2025/05/04 at 2:41 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर : प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येसंबंधी त्यांच्याच हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने हिच्यावर तपास अधिकारी यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्वांचाच रोख असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीवरुन हे उघड होत आहे. तपासादरम्यान सदर बझार पोलिसांनी हॉस्पिटलमधील 15 जणांचे जबाब नोंदविले आहेत. या सर्वांच्या जबाबातून मनीषा माने हीच डॉक्टरांची खरी मारेकरी असल्याचे समोर येत असल्याचे तपास अधिकारी तथा सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी शनिवार (ता.3) सांगितले.
विशेषत्वे, स्वत: जाळून घेण्यासह दोन्ही मुलांना मारुन टाकण्यासंबंधी संशयित मनीषा माने हिने डॉ. वळसंगकरांना धमकी दिली होती,

तेच कारण किंवा प्रबळ पुरावा आमच्यादृष्टीने डॉक्टरांच्या आत्महत्येसंबंधी असल्याचे लकडे यांनी आवर्जून सांगितले. ई-मेलद्वारे डॉ. वळसंगकरांना संशयित माने हिने धमकावले होते. त्याच आधारे डॉक्टरांची सुसाड नोट आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येसंबंधी ही महत्वाची बाब असतानाच, संशयित मनीषा माने हिने आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांना अन्य कोणत्या प्रकारे त्रास दिला होता का? ज्या त्रासातून आत्महत्या करण्याची त्यांची मानसिकता झाली, त्यांनी स्वत:ला संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलले, याचा खोलवर तपास सुरु असल्याचे तपास अधिकारी लकडे म्हणाले.

पोलिस उपायुक्त विजय कबाडे परदेशी,
तपासासाठी उपायुक्त दीपाली काळेंचे मार्गदर्शन
पोलीस उपायुक्त (परिमंडल) विजय कबाडे यांचे मार्गदर्शन डॉ. वळसंगकरांच्या घटनेसंदर्भात चौकशीसाठी होत होते. मात्र ते ब्राझीलला गेले आहेत. तद्नंतर आता पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या आत्महत्येसंबंधी तपास सुरु असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

तपास अधिकारी अजित लकडेंची
‘तीच’ ती गोलमाल अन् टिपीकल उत्तरे
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येच्या घटनेला तब्बल 14 दिवस उलटत आहेत. तथापि, डॉक्टरांच्या आत्महत्येचे खरे गूढ अद्याप समोर आलेले नाही. 14 दिवसांच्या तपासात पोलीस घटनेच्या मुळाशी जाऊ शकले नाहीत, खरे तर त्यांना घटनेच्या मुळाशी जायचं आहे का? असा तमाम सोलापूरवासियांचा सवाल आहे. सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी अजित लकडे यांनी या घटनेच्या अनुषंगाने, माहिती देण्यासंबंधी अत्यंत कमालीची गुप्तता पाळली आहे. अनेक दिवस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे भ्रमणध्वनी रिसीव्ह न करणार्‍या लकडे यांनी शनिवारी भ्रमणध्वनी रिसीव्ह केले. मात्र ‘सखोल तपास सुरु आहे, योग्य वेळी आम्ही माहिती देऊ, संशयित मनीषा माने हिच्याकडून अजून माहिती घ्यायची आहे, अशी तीच ती गोलमाल अन् टिपीकल उत्तरे देत माहिती दडविण्याचा प्रयत्न केला.

अगा नवल…
लकडे म्हणताहेत, तुम्ही धागेदोरे द्या आम्ही तपास करु…
वास्तविक पाहता डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येला साधारण 14 दिवस उलटले. अत्यंत धक्कादायक घटनेच्या अनुषंगाने, झालेल्या पोलीस तपासातून अद्याप डॉक्टरांच्या आत्महत्येच्यासंबंधी कसेनच गूढ उकललेले नाही.जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींकडून तपास अधिकारी अजित लकडे यांच्यसाकडे माहिती द्या, डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल धागेदोरे हाती लागले का? हे विचारण्याचा ‘लकडा’ लावला जातो, तेव्हा तपास अधिकारी लकडे म्हणताहेत की, तुमच्याकडेच काही माहिती घटनेच्याबद्दल असेल तर द्या, आम्ही तपास करु. तुम्हाला पत्र देऊन माहिती देण्यासंबंधी साक्षीदार करु. खरं तर याप्रकरणाचा तपास मुळापर्यंत जाऊन करण्याची जबाबदारी तपास अधिकारी लकडे यांची असताना ते आम्हाला माहिती द्या, आम्ही तपास करु असे म्हणताहेत, हे नवल असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये आहे.

You Might Also Like

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी

सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख

जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी

सोलापूरच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अर्रारा…ऑडिओ क्लीपचा बॉम्ब फुटला, रामराजेंची महिलेसंबंधीची ‘ही’ भानगड बाहेर आली… महाराष्ट्रात खळबळ उडाली!
Next Article बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?