Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना काळात आश्रय दिल्याचा गैरफायदा घेवून चालकाने महिला अधिकार्‍याशी केले दुष्कर्म
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कोरोना काळात आश्रय दिल्याचा गैरफायदा घेवून चालकाने महिला अधिकार्‍याशी केले दुष्कर्म

Surajya Digital
Last updated: 2021/08/13 at 10:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : कोरोना काळात घरात आश्रय दिल्याचा गैरफायदा घेवून एका खाजगी चालकाने महिला अधिकार्‍याला जीवे मारण्याची धमकी देवून वारंवार दुष्कर्म केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महेश नवनाथ करपे (रा. ममदापूर ता. बार्शी ) असे आरोपीचे नाव आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये आरोपी हा पिडितेच्या खाजगी गाडीवर बदली चालक म्हणून गेला होता. या दरम्यान तो कोरोनाबाधित झाल्याने त्यास त्याच्या घरमालकाने हाकलून दिले होते. त्यामुळे त्याने पिडिता व तिच्या वडिलांकडे काही दिवस घरात राहू देण्याची विनंती केली. त्यांनी आश्रय दिल्यानंतर त्याने पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देवून रात्री तिच्याशी दुष्कर्म केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एके रात्री तो पिडितेच्या खोलीकडे जात असताना तिच्या वडिलांनी पाहिल्यानंतर त्यास हाकलून दिले. त्यानंतर त्याने पिडितेला गाठून बदनामी करण्याची धमकी देवून तिच्याकडून 30 हजार रुपये उकळले. काही दिवसांनी पिडिता आपल्या कार्यालयात गेली असता त्याने तिचा पत्ता मिळवून कार्यरत असलेल्या कार्यालयामध्ये जावून तिला धमकावून एक लाख रुपयाची मागणी केली. पिडितेची बदली झाल्यानंतर नवीन नियुक्तीच्या ठिकाणी ती राहत असलेल्या घराजवळच त्याने खोली केली आणि धमकी देवून वारंवार बोलावून विविध लॉजमध्ये नेऊन तिच्याशी दुष्कर्म केले.

त्यावेळी त्याने एकांतातील काही फोटो आणि व्हिडीओ तयार केले. तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ करु लागला. तिच्या कार्यालयात जावून तू नवर्‍याला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर अशी मागणी करु लागला. त्याच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यानंतर तिने आपल्या पतीच्या कानावर सर्व प्रकार घातला आणि त्याच्याविरुध्द पोलिसांमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्याने पिडितेच्या भावजयीला काही अश्लील फोटो पाठविले आणि तो पीडितेच्या वडिलांच्या घराजवळ राहण्यास गेला. त्यामुळे पिडितेला आपल्या वडिलांना त्याच्याकडून धोका होण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #advantage #Corona #shelter #driver #raped #femaleofficer, #कोरोना #काळात #आश्रय #गैरफायदा #चालक #महिलाअधिकार्‍याशी #दुष्कर्म
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारला धक्का; राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत, याचिका निकाली
Next Article पंढरपुरातील संचारबंदीचा फेरविचार करावा, दोन्ही आमदारांनी घेतली भेट

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?