Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन अपघातात दोघांचा मृत्यू, गणपती विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

दोन अपघातात दोघांचा मृत्यू, गणपती विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/09/20 at 9:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ : मोटारसायकलला कंटेनरने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना मोहोळ कुरुल रोडवर नजीक पिंपरी येथे घडली. आणखी एका अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूर ग्रामीण भागात गणपती विसर्जनावेळी एका तरुणाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसभर काम करून आपल्या सध्या रहात असलेल्या पिंपरी गावातील घराकडे निघाले असताना  बिरू खंडू पांढरमिसे (वय ५० रा. शिरापूर  सध्या  नजीक पिंपरी) यांना कंटेनर (क्रमांक टी एन o ६ क्यु ४ ९ ८ ७) याने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांची मोटारसायकल व गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेले.

सोलापुरात उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत कंटेनर चालक राकेश  मनी राम (रा  धन्डाल लेखु राजगर जि  चोरू राजस्थान)  याच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.

* बाणेगाव येथे दुचाकीच्या धडकेने पादचारी ठार

सोलापूर : बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे दुचाकीच्या धडकेने संतोष बबन आळंगे (वय ३८ रा. बाणेगाव ) हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. हा अपघात सोमवारी दुपारच्या सुमारास घडला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संतोष आळंगे हे  दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास रस्त्यावरून पायी घराकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून एमएच१३- सिव्ही-१२४३ या क्रमांकाची दुचाकी धडकल्याने  डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते वाटेतच मरण पावले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

* गणपती विसर्जनावेळी तरुणाचा बुडून मृत्यू

सोलापूर : गणपती विसर्जनाच्या वेळी शमशापूर (ता. उतर सोलापूर) येथील सीना नदीच्या पात्रात बुडून मयत झालेल्या सागर अमरसिंग मदनावाले (वय २२ रा. उत्तर सदर बझार, लोधीगल्ली) याचा मृतदेह तब्बल २४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज सोमवारी दुपारच्या सुमारास हत्तुर येथे आढळून आला. काल रविवारी दुपारच्या सुमारास तो पाण्यात बुडाला होता.

सागर मदनावाले हा काल रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शमशापुर येथील नदीत गणपती विसर्जनासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवासी, मच्छिमार, अग्निशामक दल आणि ग्रामीण पोलिसांनी त्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशारीपर्यंत मिळून आला नाही.

आज सकाळपासून पुन्हा नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास हत्तुर शिवारातील गुरप्पा वाले यांच्या शेताजवळच्या नदीपात्रात त्याचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला. मयत सागर मदनावाले हा अविवाहित असून तो मजुरीचे काम करीत होता. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून फौजदार दीपक दळवी हे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Twodied #twoaccidents #youngman #drowned, #दोनअपघातात #दोघांचा #मृत्यू #गणपती #विसर्जनावेळी #तरुणाचा #बुडून #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर बसवणार जॅमर – टोपे
Next Article सांगोल्यात शेततळ्यात पाय घसरून नवरा बायकोचा मृत्यू, बोरामणीत अनोळखी महिलेचा गळा दाबून खून

Latest News

Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Živa ruleta v spletnih igralnicah v Sloveniji – Vodnik za igralce
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?