मुंबई, ३ एप्रिल (हिं.स.) : मुंबई विमानतळावर १७.८९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे मुंबई कस्टम्स विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतले, जो अंदाजे १.७८९ किलो संशयित कोकेन घेऊन जात होता, ज्याची बेकायदेशीर बाजार किंमत १७.८९ कोटी रुपये आहे. या प्रकरणी संशयित व्यक्ती नैरोबीहून दोहा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, संशयास्पद हालचालीवरून प्रवाशाला तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. सामानाची तपासणी करताना, कस्टम अधिकाऱ्यांना प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवलेला एक पांढरा पावडर सदृश पदार्थ आढळला. या पदार्थाची कोकेनसाठी पॉझिटिव्ह चाचणी करण्यात आली, त्याचे वजन सुमारे १.७८९ ग्रॅम होते आणि त्याची किंमत १७.८९ कोटी रुपये होती. संशयिताला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.