Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्याध्यापकास शिक्षकाकडून कान फाटेपर्यंत मारहाण; कारवाईस शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मुख्याध्यापकास शिक्षकाकडून कान फाटेपर्यंत मारहाण; कारवाईस शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडवर

Surajya Digital
Last updated: 2023/10/07 at 12:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

》 अहवालानंतरच दोषीवर कारवाई होईल

 

Contents
》 अहवालानंतरच दोषीवर कारवाई होईलस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● प्रकरण खूपच गंभीर, कारवाईत हयगय नाही : मिरकले

सोलापूर : रजेच्या कारणावरून सहशिक्षकाने मुख्याध्यापकाला मारहाण केल्याचा कुंभारी जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या प्रकाराबाबत अहवाल मागविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. Headmaster beaten up by a teacher until his ear was torn off; Kumbhari Solapur Zilla Parishad on Action Mode Education Officer

 

रजा नाकारल्यावरून कुंभारी जिल्हा परीषद शाळेतील महेश क्षीरसागर या शिक्षकाने मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना गुरुवारी सकाळी मारहाण केली होती. या घटनेमध्ये मुख्याध्यापकाचे कान फाटले असून, ते जखमी झाले आहेत. मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील हे कामकाज करीत असताना रजेच्या कारणावरून क्षीरसागर नावाच्या सहशिक्षकाने मारहाण केली. ते कपाटातून फायली काढत असताना त्या शिक्षकाने मागून त्यांच्यावर हल्ला चढविला, असे जखमी मुख्याध्यापकांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचारास दाखल झाल्यावर पोलिसांना सांगितले.

 

शिक्षकाच्या मारहाणीत मुख्याध्यापक जखमी झाल्याचे पाहून गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले. क्षीरसागर यांनी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना रजा मागितली. परंतु आज शाळेत कार्यक्रम आहे, रजा देता येणार नाही, असे सांगत मुख्याध्यापक पाटील यांनी त्यांना रजा नाकारली. त्यामुळे संतापलेल्या क्षीरसागर याने मुख्याध्यापक पाटील यांना लाकडी दांडका व लाथाबुक्याने मारहाण केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू, कुंभारीचे सामाजिक कार्यकर्ते गजानन होनराव, स्वप्निल थिटे, ग्रामपंचायत सदस्य वंजारी, आप्पाशा चांगले यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि जखमी मुख्याध्यापक पाटील यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविले.

या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. त्यानंतर त्या शिक्षकाने वळसंग पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकानेच मारहाण केल्याची तक्रार दिली. वळसंग पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापक पाटील जखमी झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. या ठिकाणी तक्रार नोंद झाल्याने त्यांच्या फिर्यादीवरून सहशिक्षक क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

● प्रकरण खूपच गंभीर, कारवाईत हयगय नाही : मिरकले

 

संबंधित मारहाण प्रकरणातील सहशिक्षक आणि मुख्याध्यापक या दोघांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काय केले व नेमका प्रकार काय घडला हे तेथे उपस्थित असलेल्या शिक्षकांकडून माहिती घेऊन सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत दक्षिण सोलापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला कळविल्याचे मिरकले यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शाळेचे कामकाज सुरू असताना अशी घटना घडणे बरोबर नाही. हा प्रकार खूपच गंभीर आहे, त्यामुळे कारवाईबाबत हयगय केली जाणार नाही, असे मिरकले यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Headmaster #beaten #teacher #until #ear #tornoff #Kumbhari #Solapur #ZillaParishad #ActionMode #EducationOfficer, #कुंभारी #जिल्हापरिषद #मुख्याध्यापक #शिक्षक #कान #फाटेपर्यंत #मारहाण #कारवाई #सोलापूर #शिक्षणाधिकारी #ॲक्शनमोड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात भर शाळेतच मुख्याध्यापकाला बदडले, महिला केंद्र प्रमुखालाही केली दमदाटी
Next Article महापालिका आयुक्तांनी काढले 6 अधिकाऱ्यांच्या सुधारित विभाग वाटपाचे आदेश !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?