Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अर्थ अवर : आज 8.30 वाजता विद्युत दिवे बंद करुन केला जाणार साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

अर्थ अवर : आज 8.30 वाजता विद्युत दिवे बंद करुन केला जाणार साजरा

Surajya Digital
Last updated: 2021/03/27 at 5:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी घरातील विद्युत दिवे बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस अर्थ अवर दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी तो आज (27 मार्च) आला आहे. त्यामुळे आज देशांतील लोकं रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत घरातील विद्यूत दिवे बंद ठेवतील आणि उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकतेचा संदेश देतील.

आज रात्री जगभरात अर्थ अवर साजरा करण्यात येणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दर वर्षी ‘अर्थ अवर’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. पृथ्वीला अधिक चांगले करण्यासाठी आपला एकताचा संदेश या माध्यमातून दिला जातो.

पर्यावरण संबधीत समस्यांविषयी लोकांना जागरूक करणे आणि त्याच्या सुरक्षिततेत हातभार लावण्यासाठी त्यांना पुढे आणणे हे यामागचे एकमेव उद्दीष्ट आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे महत्त्व कोरोना साथीच्या निमित्ताने आणखी वाढले आहे. 31 मार्च 2007 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात प्रथमच अर्थ अवरचं आयोजन करण्यात आलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारत 2009 मध्ये या मोहिमेचा भाग बनला होता. यात 58 शहरांमधील 50 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. 2010 मध्ये भारतातील 128 शहरांतील 70 लाखांहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला होता. यानंतर ही संख्या वाढतच आहे. राजधानी दिल्लीतील वीज वितरण कंपन्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना जागरूक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ने 2007 मध्ये अर्थ अवर डे सुरू केला. अर्थ अवर फाउंडेशनचे सह-संस्थापक अँडी रिडले यांनी WWF च्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली. 2008 मध्ये अर्थ अवर डेमध्ये 35 देशांनी सहभाग घेतला होता. यावर्षी, 178 देशांमध्ये अनावश्यक वीज रात्री 8.30 ते 9.30 पर्यंत बंद केली जाणार आहे. अर्थात यावेळी संपूर्ण जगात ब्लॅक आऊट होईल. बरेच लोक मेणबत्त्या पेटवून अर्थ अवर देखील साजरे करतात. पर्यावरण तज्ञांच्या मते, WWF च्या या जागतिक मोहिमेची हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर लढायला मदत करेल.

दरम्यान, अर्थ अवर डे जगभरातील अनेक ऐतिहासिक इमारतींची लाईट बंद केली जाते. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलिस अशा 24 जगप्रसिद्ध वास्तूंचा समावेश आहे. भारतातील अर्थ अवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक वास्तूंची लाईट बंद केली जाते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #EarthHour #Celebration #today #8.30am #electric #lightsoff, #अर्थअवर : #आज8.30वाजता #विद्युतदिवे #बंदकरुन #केलाजाणार #साजरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनापासून मुक्ती दे; पंतप्रधान मोदींचे बांगलादेशातील कालीमातेला साकडे
Next Article पुण्यात रात्री भयंकर आग, 800 दुकानं जळून खाक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?