नवी दिल्ली , 10 जुलै (हिं.स.)।दिल्ली -एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशातच आज (दि.१०) सकाळ दिल्लीत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंपाचा धक्का जाणवला आहे. आज सकाळी ९.०३ वाजण्याच्या सुमारास जवळपास १० सेकंदांपर्यंत जमीन हलत होती. भुकंपाचे धक्के गाझियाबाद, नोएडा आणि दिल्ली परिसरात जाणवले.
प्राथमिक अहवालानुसार रोहतक, हरियाणा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून, तीव्रता 4.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे.भूकंपामुळे भर पावसातही लोकांनी घराबाहेर पळ काढला होता.भूकंप १० सेकंदच झाला. यामध्ये कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही.अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.