Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Surajya Digital
Last updated: 2022/04/30 at 8:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : ED ने Redmi आणि Mi सारख्या लोकप्रिय मोबाइल फोन ब्रँड बनवणारी चीनी कंपनी Xiaomi ची 5,551 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कंपनीविरुद्ध परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन व मनी लॉन्डिंग केल्याप्रकरणी ED चौकशी करत आहे. कंपनीचा हा पैसा भारतातील अनेक वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करण्यात आला होता. दरम्यान, या कारवाईमुळे ब्लॅक मनी गोळा करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ED action against popular mobile company; Assets worth Rs 5,551 crore seized

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बँक खात्यांमध्ये असलेली 5,551.27 कोटी रुपयांची रक्कम ईडीने जप्त केली आहे. Xiaomi इंडिया कंपनीने देशाबाहेर बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपासंदर्भात ईडीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चौकशी सुरू केली होती.

ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 (FEMA) अंतर्गत करण्यात आली आहे. Xiaomi India ही चीन आधारित Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पाठवलेल्या पैशाच्या संदर्भात या वर्षी फेब्रुवारीमध्ये ED ने Xiaomi विरुद्ध तपास सुरू केला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

अंमलबजावणी संचालनालयाच्यानुसार, Xiaomi ने 2014 मध्ये भारतात आपली सेवा सुरू केली होती. त्यासाठी 2015 पासून पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात झाली होती. कंपनीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीरपणे पैसे बाहेर पाठवल्याप्रकरणी तपासाच्या आधारे ईडीने कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम जप्त केली. कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे विदेशी चलन तीन परदेशी-आधारित संस्थांना पाठवल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये Xiaomi ग्रुपचे एक युनिट देखील समाविष्ट आहे.

यानंतर, त्यांना 5,5513 कोटी रुपये पाठवले. ईडीने आरोप केला, ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस आधारित (US Based) असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूहाच्या फायद्यासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती ईडीने दिली आहे.

ईडीचे म्हणणे आहे की Xiaomi इंडिया कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 मध्ये पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात केली. ईडीने सांगितले की त्यांनी आतापर्यंत परदेशातील तीन संस्थांना 5,551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे. यात रॉयल्टीच्या नावाखाली Xiaomi ग्रुपच्या युनिटचाही समावेश आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, रॉयल्टीच्या नावावर एवढी मोठी रक्कम Xiaomi India ची मूळ कंपनी Xiaomi ग्रुपच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. ज्या इतर दोन संस्थांना पैसे पाठवले गेले त्या अमेरिकेत आहेत.

ईडीच्या म्हणण्यानुसार, Xiaomi India ने या तीन विदेशी संस्थांकडून अशी कोणतीही सेवा घेतलेली नाही, ज्यासाठी त्यांना इतकी मोठी रक्कम हस्तांतरित करावी लागेल. याचे कारण म्हणजे Xiaomi India पूर्णपणे बनवलेले मोबाईल संच आणि इतर उत्पादने भारतातच खरेदी करते. ईडीने आरोप केला आहे की, Xiaomi India कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे 5,551.27 कोटी रुपये विदेशात पाठवले, जे परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या कलम 4 चे उल्लंघन आहे. परदेशात पैसे पाठवतानाही कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे.

 

You Might Also Like

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

TAGGED: #ED #action #popular #mobile #company #Assets #worth #crore #seized, #लोकप्रिय #मोबाईल #कंपनी #ईडी #कारवाई #कोटी #मालमत्ता #जप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Accident Raj Thackeray राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
Next Article Director General of Police Medal सोलापूर शहर – ग्रामीण पोलीस दलातील १७ पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?