Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्री अनिल परबपाठोपाठ सोलापुरात काम केलेल्या या आरटीओ अधिका-यांच्या घरावरही ईडीचा छापा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

मंत्री अनिल परबपाठोपाठ सोलापुरात काम केलेल्या या आरटीओ अधिका-यांच्या घरावरही ईडीचा छापा

Surajya Digital
Last updated: 2021/08/30 at 8:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई / सोलापूर : प्रादेशिक परिवहन विभागातील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विभागात होत असलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बदल्यांमधील आर्थिक व्यवहार, अनियमितता याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ सोलापुरात काम केलेले आरटीओ अधिकारी आता नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिका-यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह या आरटीओ अधिका-यांचंही नाव आहे. हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परब यांच्या अत्यंत जवळचे अधिकारी असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळंच ईडीनं यांच्या घरावर छापा टाकला असल्याचं वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या प्रकरणाशी संबंधीत नागपूरमध्ये ईडीने छापासत्र सुरू केले आहे. नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयात व घरी ईडीने कारवाई केली आहे. बजरंग खरमाटे हे अनिल परब यांच्या जवळचे अधिकारी समजले जातात.परंतु, दुसरीकडे, परीवहन मंत्री यांच्या संबधीत कोणत्याही ठिकाणांवर ED च्या धाडी पडलेल्या नाहीत. अनिल परब यांच्या संबंधित कोणत्याही ठिकाणार ED च्या धाडी पडलेल्या नाही आहेत’ असं परब यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून मनी लाँर्डींग प्रकरणात चौकशी केली जात आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांचीही चौकशी सुरू केली आहे. परब यांना ईडीनं रविवारी नोटीस पाठवली असून आज सोमवारी खरमाटे यांच्या घरासह तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून परब यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे यांचंही नाव घेण्यात आलं आहे.

खरमाटे यांचे नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. आरटीओ विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात ईडीने छापेमारी केली आहे. खरमाटे हे परब यांच्या जवळचे मानले जात असल्यानं त्यांचा परिवहन विभागात सतत राबता असायचा.  बजरंग खरमाटे हे सोलापूर येथे असताना दोन वेळा निलंबित झाले होते. बदली व पदोन्नतीसाठी त्यांच्या मुंबई व पुण्यात सतत फेऱ्या होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याअनुषंगाने खरमाटे हे ईडीच्या रडारवर आले आहेत.

* या अधिका-यांचीही नावे

गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उप परिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची नावे घेण्यात आली होती. पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडून चौकशी समितीही नेमण्यात आली होती. नाशिकच्या हद्दीत असा कोणताही गुन्हा घडला नसल्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

TAGGED: #ED #raids #house #RTO #officials #Solapur #Nashik, #मंत्री #अनिलपरब #सोलापुरात #काम #आरटीओ #अधिका-यांच्या #घरावरही #ईडीचा #छापा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीची धाड, शिवसेनेला टार्गेट केलं जातंय – भावना गवळी
Next Article सोलापुरात दोन चोरट्यांना अटक; ११ गुन्हे उघडकीस; बार्शीत 48 तासांत दुकान फोडणारे चार आरोपी पकडले

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?