Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सोडली पुडी, राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांमागे लागणार ईडी 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सोडली पुडी, राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांमागे लागणार ईडी 

Surajya Digital
Last updated: 2022/08/19 at 10:05 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पंढरपूर येथे कृषी, कार्गो विमानतळ उभाण्यासाठी प्रयत्न 

पंढरपूर : आधी भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या. त्यानंतर आ. मोहित कंबोज भाजपशिवाय इतर पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात सर्वात पुढे होते. आता माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही यामध्ये उडी घेतली असून त्यांनी राष्ट्रवादीच्या मागे लवकरच ईडी लागणार असून दहापैकी पाच नेत्यांच्या हातात बेडी पडणार असल्याची पुडी गुरुवारी माढा दौऱ्यादरम्यान टेंभुर्णी येथे सोडली आहे. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीसह सर्वच पक्षामध्ये ते पाच नेते कोण ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम सुरू झाले आहे. MP Ranjitsinh Naik Nimbalkar leaves Pudi, ED politics will follow five leaders of NCP

 

राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांची लवकरच ईडी कडून चौकशी होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामध्ये माजी मंत्री आणि आमदारांची नावे केंद्रीय तपास यंत्रणेकडे पाठवली आहेत. लावकच त्यांच्यावर कारवाई करण्यात होईल, असे खासदार निंबाळकर यांनी संगितले.

 

लवासा आणि जलसंपदा विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी एका बड्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा यामध्ये समावेश असल्याचा दावा ही खासदार निंबाळकर यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करून खळबळ उडाली दिली होती. आता खासदार निंबाळकर यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अशातच भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या दहा पैकी पाच नेत्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे पाच बडे नेते कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक चोर आहेत त्यातील कोणता चोर नेता आहे हे देखील लवकरच समोर येणार आहे.

 

लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षानंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले. खासदार निंबाळकर आज माढा मतदारसंघात आले होते.

 

□ पंढरपूर येथे कृषी, कार्गो विमानतळ उभाण्यासाठी प्रयत्न 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पंढरपूरवर विशेष लक्ष आहे. पंढरपूरच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल विमानतळ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. द्राक्ष, डाळिंब, केळी आदी फळांची निर्यात होण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा पंढरपुरात सुरू करण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #MP #RanjitsinhNaikNimbalkar #leaves #Pudi #ED #politics #follow #five #leaders #NCP, #खासदार #रणजितसिंहनाईकनिंबाळकर #सोडली #पुडी #राष्ट्रवादी #पाच #नेत्यांमागे #ईडी #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरातील एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यास जीवे मारण्याची धमकी
Next Article टुडेज ब्लॉग : ‘अमृतकाळा’तील भाजपची वाटचाल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?