Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला ईडीकडून कोणतीही नोटीस आली नाही, कारवाईचा सरनाईकांकडून निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मला ईडीकडून कोणतीही नोटीस आली नाही, कारवाईचा सरनाईकांकडून निषेध

Surajya Digital
Last updated: 2020/11/24 at 3:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. तसेच प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात असून त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. तर एका मुलास चौकशीकरिता ईडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

प्रताप सरनाईक मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं आहे.

* चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #ईडीकडून #कोणतीही #नोटीस #आलीनाही #कारवाईचा #सरनाईकांकडून #निषेध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना आमदार सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे, इतर नेतेही रडारवर, खासदार राऊत संतापले
Next Article “तीन पक्षांचे सरकार वजनानेच पडेल, लगेच भाजपा सत्ता स्थापन करणार”

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?