Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली; शुभेच्छा देण्यासाठी एनसीपीत झुंबड, कोण दिली माहिती ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली; शुभेच्छा देण्यासाठी एनसीपीत झुंबड, कोण दिली माहिती ?

Surajya Digital
Last updated: 2020/10/20 at 6:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई / जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. फक्त एकनाथ खडसेच नाहीतर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे.  मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी  दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एकनाथ खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला धक्का बसणार आहे हे निश्चित आहे. पण खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे. एवढंच नाहीतर एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना 22 ऑक्टोबरला 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन सुद्धा केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे, फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

* रोहिणी खडसेंच्या विश्वासू कार्यकर्त्याने दिली माहिती

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्याची तारीख याबद्दल खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने माहिती दिली आहे. ‘एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. समर्थकांना सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,’ असं या कार्यकर्त्याकडून सांगण्यात आलं आहे.

* खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी झुंबड

भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. कारण मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी सुरू केली असून त्यावरून कमळाचे फूल गायब झालं आहे. तसंच ‘नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’ असं म्हणत खडसेंच्या नव्या राजकीय वाटचालीला शुभेच्छाही दिल्या आहेत.

एकीकडे, खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी मुंबईत दाखल होण्याची तयारी सुरू केली असतानाच दुसरीकडे जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा खडसे यांच्या निवासस्थानाकडे वळवला आहे. खडसे यांच्या घरी येत राष्ट्रवादीची कार्यकर्ते त्यांना पक्षप्रवेशासाठी शुभेच्छा देत आहेत.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #एकनाथखडसे #राष्ट्रवादी #प्रवेशाची #तारीखठरली #शुभेच्छा #देण्यासाठीएनसीपीत #झुंबड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुझ्यावर खर्च केलेले 50 हजार दे; प्रेमभंगाचे प्रकरण थेट न्यायालयात
Next Article शेतक-यांच्या असाह्यतेवर राजकारण करू नका, पंतप्रधान दारुड्यासारखे देश विकायला निघालेत

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?