Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकनाथ खडसे पक्षांतर करतील, हे सत्य आहे : गुलाबराव पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ खडसे पक्षांतर करतील, हे सत्य आहे : गुलाबराव पाटील

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 5:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जळगाव : भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात खडसेंच्या पक्षांतराचे संकेत देणारी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील हे आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते बोलत होते. सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कारण, मुंबईत खडसेंची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांसोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत 4 दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही.

मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसेंच्या शिवसेना प्रवेशाकडे अंगुलीनिर्देश करत आहे.

* खडसेंना शिवसेनेची खुली अॉफर

मध्यंतरी खडसेंनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून घातला जात होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसेंनी याबाबत कोणतेही मत मांडले नव्हते. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #गुलाबरावपाटील #खळबळजनक #विधान #खडसे #पक्षांतर #करणार #सत्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विजेच्या धक्क्याने पोलिस शिपाईचा मृत्यू; पाच महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
Next Article तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवणाऱ्या सायरा बानो यांनी केला भाजपात प्रवेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?