Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची दांडी; खडसेंचा फडणवीसांवरील रोष कायम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची दांडी; खडसेंचा फडणवीसांवरील रोष कायम

Surajya Digital
Last updated: 2020/10/13 at 6:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसेची पुढची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागलेले आहे. त्यातच आज जामनेरमध्ये रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खडसे – फडणवीस महाजन एकाच मंचावर एकत्रित येणार होते. परंतु, आपण हजर राहणार नसल्याचे खडसे यांनी आधीच जाहीर केले आणि एकत्र येणे टाळले.

गेल्या काही वर्षापासून आपल्यावर पक्षातंर्गत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. नेमके याच काळात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते होत असल्याने गिरिश महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते, त्यामुळे त्याठिकाणी खडसे- फडणवीस भेटीबाबत उत्सुकता लागून होती. मात्र, खडसे यांनी मंगळवारी दुपारीच जामनेरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

* नाराजी दूर होईल, फडणवीसांना आशा

नाथाभाऊंना राजकारण नीट समजते. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे, असं सूचक उत्तर फडणवीस यांनी जामनेर दौऱ्यात दिले. नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्हा सर्वांची इच्छा आहे की, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. नाथाभाऊंना राजकारण देखील नीट समजते. मला विश्वास आहे की, ते योग्य निर्णय घेतील. माझी नाथाभाऊंशी आज कुठलीही चर्चा झालेली नाही. पण, योग्यवेळी चर्चा मी करेन. मला वाटते ते योग्य निर्णय घेतील” असे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. यावरुन फडणवीसांना एकनाथ खडसेंचे मन वळवण्याची आशा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* खडसेंचा फडणवीसांवरील रोष कायम

गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताणली गेलेली फडणवीस- खडसेंच्या संभाव्य भेटीची उत्सुकता अखेर संपली. एकनाथ खडसे यांनी गेल्या काही महिन्यात देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत थेट निशाणा साधला होता. मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणी प्रत्यक्ष बैठकीला दांडी मारत खडसे ऑनलाईन सहभागी झाले होते. फडणवीस उपस्थित असल्यामुळेच खडसेंनी हजेरी टाळल्याची चर्चा होती. यावरुनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसेंचा रोष कायम असल्याचे दिसून येते.

* गुप्त बैठकीलाही खडसेंची दांडी; सुनेची हजेरी

गिरीशभाऊ म्हणजेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपल्याला काल निमंत्रण दिलं होतं. आजही त्यांचा फोन आला, भोजनाचंही निमंत्रण होतं. उत्तर महाराष्ट्रात अशी सुविधा असलेले हॉस्पिटल नाही, जामनेरसारख्या छोट्याशा तालुक्यात एवढे मोठे हॉस्पिटल उभारले जात आहे, यासाठी मी त्यांचे कौतुक केले, अभिनंदन केले, मात्र व्यक्तिगत कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवलं, अशी माहिती माध्यमाशी बोलताना दिली. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपच्या गुप्त बैठकीलाही एकनाथ खडसे गैरहजर होते. मात्र खडसेंच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे या बैठकीला उपस्थित होत्या.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #एकनाथखडसे #देवेंद्रफडणवीस #जामनेर #कार्यक्रमास #दांडी #गिरीशमहाजन #रोष #कायम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? खून करणार आहेत का ? शिवसेनेला जाहीर आव्हान
Next Article दिशाभूल करणा-या या कोडिंग जाहिरातींना बळी पडू नका; शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?