मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांच्या टीकेची धार आणखी वाढलेली आहे. त्याचबरोबर ओबीसीचा मुद्दाही त्यांनी लावून धरला आहे. यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं, सातत्याने ते फडणवीसांना टार्गेट करत आहेत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत, असंही त्यांनी सूनावलं.
दरेकर म्हणाले, ओबीसीसाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना जेवढं काम केलं तेवढं कुणीही केलं नाही. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम फडणवीस सरकारने केलं होतं. आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातूनच येतात. याचा उल्लेख आम्ही करत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र भापला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला हा उल्लेख करावा लागतो असंही ते म्हणाले. दरेकरांच्या या टीकेनंतर भाजप आता खडसेंविरुद्ध आक्रमक होणार असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये भाजपला पहिला हादरा दिला आहे. जिल्ह्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
* राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरु
खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश करून काही दिवस होत नाही तेच जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते गळाला लागले आहे. जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.