श्रीपूर : श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवाराने अर्ज दाखल केले. आता एकूण २१ जागांसाठी ३० उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत.
मात्र सर्व दाखल अर्ज परिचर गटातील असल्यामुळे , या अर्जातील काही अर्ज पूरक असल्याने यामधील २१ अर्जच कायम राहणार आहेत. त्यामुळे पांडुरंग कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असून याची फक्त औपचारिकता बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यात कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक हे बिनविरोध झाले आहेत.
गटनिहाय दाखल झालेल्या अर्जांची संख्या पुढील प्रमाणे चळे गट— ३ अर्ज दिनकर मोरे, सुदाम मोरे, हरीश गायकवाड खर्डी गट— भास्कर कसगावडे, वसंतराव देशमुख यांचे दोन अर्ज, लक्ष्मण ज्ञानोबा कसगावडे, उमेश प्रभाकर परिचारक यांचे दोन अर्ज, गादेगाव गटातुन— भगवान भीमराव चौगुले, महावीर आगतराव चौगुले, बाळासाहेब दादासो यलमार, गंगाराम गणपती विभुते, करकंब गटातून— कैलास शंकराव खुळे, ज्ञानोबा श्रीरंग ढोबळे, विजय अंगत जाधव, हनुमंत शंकराव खुळे, रोपळे गटातून— दिलीप त्रिंबक चव्हाण, लक्ष्मण गोरख धनवडे, गणेश दिलीप चव्हाण, गणगे परमेश्वर बजरंग, हनुमंत हरिदास कदम असे अर्ज आले असून
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून संतोष औदुंबर घोडके, भैरू संतोष वाघमारे तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग साठी तानाजी मारुती वाघमोडे, हनुमंत भीमराव केसकर तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातून किसन विठ्ठल सरवदे, महिला राखीव प्रवर्गातून सुशिलाबाई मधुकर पाटील, संगीता शामराव साळुंखे असे एकूण २१ जागा साठी ३० अर्ज आलेले आहेत.
ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असून १२ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डाॅ. विजयकुमार देशमुख यांनी दिली.
* आमदार परिचारकांचा सन्मान
परिचारक कुटुंबाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याबरोबरच सर्वसामान्यांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य साखर कारखाना, बँक असा नावलौकिक संपादन केला आहे.

पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत सहकारात आदर्श निर्माण केला आहे, असे झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी सांगितले. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने वसंतदादा पाटील यांच्या नावे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बेस्ट चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांचा मंगळवेढा येथील पांडुरंग परिवाराच्या वतीने झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. प्रशांत परिचारक म्हणाले की, सुधाकरपंत परिचारक मालकाच्या आशीर्वादानेच हा एकपुरस्कार मिळाला. हा फक्त माझा सन्मान नसून पांडुरंग परिवारातील प्रत्येक घटकाचा सन्मान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
