Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारणशिवार

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या

Surajya Digital
Last updated: 2021/04/28 at 6:11 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 25 एप्रिल ते 23 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील 277 बाजार समित्यांच्या निवडणूका होणार होत्या. या निवडणुका पुढे गेल्याने आता संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे.

एमबीबीएस आणि एमडीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात https://t.co/yiwp0oiiwh

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021

राज्यात कोविड विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पुन्हा एकदा सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने २४ एप्रिल पासून २३ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे ३०६ पैकी २७७ बाजार समित्यांच्या निवडणूका पुढे गेल्याने विद्यमान संचालक मंडळच कारभार पाहणार आहे.

दिलासादायक ! राज्यात मागील 24 तासात तब्बल 71 हजार 736 जण कोरोना मुक्त, 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त तर सोमवारी 5 लाख जणांचे लसीकरण; विक्रमी नोंदhttps://t.co/J7wPztIS0x

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021

* फक्त अंतरिम व्यवस्था म्हणून काम पाहता येईल

ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत. ज्या प्रकरणी उच्च व सर्वाच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा बाजार समित्या वगळून अन्य बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या २२ एप्रिलच्या आदेशाच्या दिनांकास ज्या बाजार समितीची संचालक मंडळे कार्यरत आहेत. परंतु मुदतवाढीच्या कालावधीत ज्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अशा संचालक मंडळाविरुध्द अनियमिततेबाबत तक्रारी आहेत. या तक्रारीनुसार प्रत्यक्ष चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशी संचालक मंडळे वगळून इतर संचालक मंडळाना निवडणूका पुढे ढकलण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. तथापि, अशा संचालक मंडळांना त्यांचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या पुढील लगतच्या दिनांकापासून, मुदतवाढ मिळाल्याच्या दिनाकांपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. फक्त अंतरिम व्यवस्था म्हणून काम पाहता येईल.

किंग्स पंजाबचा पुन्हा पराभव, कोलकाता नाईट रायडर्सचा विजय https://t.co/y5gItOy3yy

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021

या आदेशाच्या दिनांकास ज्या कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळ कार्यरत आहेत. त्या प्र्शासक किंवा अशासकीय प्रशासक मंडळासही २३ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही शासनाचे उपसचिव का.गो. वळवी यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

भारत, हिम्मत बनाए रखो #StayStrongIndia #स्टेस्ट्रॉगइंडिया #surajyadigital #india #strong #staystrong #सुराज्यडिजिटल
अबू धाबीने कोविडच्या कठीण काळात तिरंगा फडकावून भारताला पाठिंबा दर्शविलाय…. pic.twitter.com/94UJl8PRKE

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021

* घोषित लॉकडाऊन प्रक्रियेत निवडणुका घेणे घातक

बाजार समित्यांच्या निवडणुकीकरिता ग्रामपंचायत सदस्य आणि कृषि पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांमधून निवडून आलेले सदस्य हे मतदार आहेत. अशा राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणा-या कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कोविडचा संसर्ग वाढत असल्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे उचित होणार आहे. तसेच कोरोना साथीमुळे घोषित लॉकडाऊन प्रक्रियेत निवडणुका घेणे महागात पडणार आहे. यामुळेही बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Elections #state's #Agricultural #ProduceMarket #Committee #postponed #sixmonths, #राज्यातील #कृषीउत्पन्नबाजार #समितीच्या #निवडणुका #सहामहिने #पुढेढकलल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article किंग्स पंजाबचा पुन्हा पराभव, कोलकाता नाईट रायडर्सचा विजय
Next Article 1 जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढवला जाणार नाही

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?