उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील मंथन महादेव मठे यांचा विजेचा शॉक लागल्याने जागेवरच मृत्यू झाला असल्याची नोंद तालुका पोलिसाता करण्यात आली आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ,पत्नी व मूल असा परिवार असून पुढील तपास कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज दुपारी १:३० च्या सुमारास मंथन स्वतः च्या शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. वायर कट झालेली कल्पना नसल्याने त्याला स्पर्श झाला. जोराचा शॉक लागून जमिनीवर कोसळला. जवळ कोणीही नसल्याने ही घटना घडली असल्याची माहिती शंकर मठे यांनी दिली. उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.