Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । महावितरणने पकडल्या कोट्यवधी रुपयांच्या वीजचोऱ्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर । महावितरणने पकडल्या कोट्यवधी रुपयांच्या वीजचोऱ्या

Surajya Digital
Last updated: 2022/12/11 at 4:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
→ नोव्हेंबरमध्ये १७५ वीजचोऱ्या आल्या उघडकीस→ सोलापुरातील नातेपुते वीज चोरीचा समावेशसोलापूर : नोव्हेंबर मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांची १७५ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. थडक कारवाई मुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे. उघडकीस आणलेल्या वीज चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. Solapur. Mahavitaran caught electricity thefts worth crores of rupees in Puneस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● पुण्यात साडे तीन कोटींची वीजचोरी

→ नोव्हेंबरमध्ये १७५ वीजचोऱ्या आल्या उघडकीस

→ सोलापुरातील नातेपुते वीज चोरीचा समावेश

सोलापूर : नोव्हेंबर मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांची १७५ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. थडक कारवाई मुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे. उघडकीस आणलेल्या वीज चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. Solapur. Mahavitaran caught electricity thefts worth crores of rupees in Pune

 

नोव्हेंबरमध्ये पुणे ग्रामीण भागातील उरुळीकांचन परिसरात रात्रीच्या वेळी भरारी पथकाने धाड टाकून पेट्रोल पंपाची वीजचोरी उघडकीस आणलेली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरला जंपर टाकून बायपास करून करण्याची तरतूद केलेली होती. ग्राहकास ९० हजार १७९ युनिटचे १९ लाख ४२ हजार १८२ रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

 

दुसऱ्या प्रकरणात पुणे शहर भागातील ८० केडब्ल्यू जोडभार  असलेल्या व्यावसायिक ग्राहकाची वीजचोरी पकडण्यात आली. सदर व्यावसायिक ग्राहकाने मीटरच्या आधी एल. आहे. टी. केबलला टॅप करून मीटर बायपास करून वीजचोरी केलेली होती. सदर ग्राहकांनी ८० हजार ४३८ युनिट्सची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना २८ लाख १४ हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

 

तिसऱ्या प्रकरणात कोल्हापूरमधील इचलकरंजी आगामी भागातील ९१ एच. पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. सदर औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले व ९० हजार २०८ युनिटस् चोरी केल्यामुळे त्यांना १५ लाख २१ हजार ७१० रुपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सोलापूरमधील नातेपुते  भागातील ६० एच. पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी उघडकीस आलेली आहे.  सदर औद्योगिक ग्राहकाने दुसऱ्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरून एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे त्यांना ६९ हजार ५५५ युनिट्सची वीज चोरी केल्यामुळे ११ लाख ५५ हजार ३०० रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंपल यांनी दिले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार हे पुणे प्रादेशिक विभागातील वीज चोरांवर कडक पाळत ठेवत आहेत.

 

● पुण्यात साडे तीन कोटींची वीजचोरी

 

महावितरणच्या पुणे विभागाने नोव्हेंबर महिन्यात मोठी वीजचोरी उघडकीस आणली आहे. पुणे विभागात जवळपास 3 कोटी 56 लाख रुपयांची वीजचोरी प्रकरण उघडकीस आली आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने ही थेट कारवाई केली आहे. वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई होत असल्याने वीज चोरी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. वीजचोरी करणाऱ्या व्यावसायिकांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

You Might Also Like

26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका : फडणवीस

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

दगडूशेठ गणपतीसमोर ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

TAGGED: #Solapur #Mahavitaran #caught #electricity #thefts #worth #crores #rupees #Pune, #सोलापूर #पुणे #महावितरण #पकडल्या #कोट्यवधी #रुपये #वीजचोऱ्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नव्या संधी’, शाश्वत विकासावर विश्वास – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next Article मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात गुरव समाजासाठी केली मोठी योजना जाहीर

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?