कोल्हापूर, 8 ऑगस्ट – माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्याबाबत ‘वनतारा’चे सीईओ विशेष प्रस्ताव घेऊन मठात आले. त्यांनी माधुरीसाठी स्वतंत्र प्रकल्प उभारून उपचार व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मठातील स्वामी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहूल आवाडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वनतारा व्यवस्थापनाची सकारात्मक भूमिका आणि ठोस प्रस्तावामुळे चर्चेत सर्वांचे समाधान झाले. पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी माधुरी हत्तीणीचे मठातच पुनर्वसन होणार असल्याने हा वाद आता संपल्याचे स्पष्ट केले.