Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार पदावरून एलन मस्क यांची एक्झिट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागार पदावरून एलन मस्क यांची एक्झिट

admin
Last updated: 2025/05/29 at 5:53 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 29 मे (हिं.स.)।डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या आर्थिक सुधारणेसाठी उलटसुलट निर्णय घेणारे, ट्रम्प यांच्या खास डॉज समितीचे अध्यक्ष अब्जाधीश एलन मस्क यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रम्प यांच्या सल्लागाराचे पद सोडत असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे.

एलन मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीले आहे की, अमेरिकन सरकारमधील विशेष कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आला आहे. ‘सरकारी खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो. कालांतराने डीओजीई मिशन अधिक मजबूत होईल” असे त्यांनी म्हटले आहे.या एक्झिटमागे कारण काही वेगळेच असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारी पद सोडताना एलॉन मस्क म्हणाले की, “आता मी टेस्ला आणि स्पेसएक्ससाठी पूर्णपणे समर्पित आहे. मी माझे राजकीय खर्च देखील कमी करेन, कारण मला वाटते की मी माझे योगदान दिले आहे. त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते की ते राजकारणातून मागे हटतील आणि त्यांच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतील.”

एलॉन मस्कच्या या विधानाला काही रिपब्लिकन नेत्यांनीही पाठिंबा दिला. सिनेटर रॉन जॉन्सन (विस्कॉन्सिन) म्हणाले की. मला एलॉनच्या निराशेबद्दल सहानुभूती आहे. मात्र, राष्ट्रपतींवर दबाव आणल्याने कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही”. हाऊस स्पीकर माइक जॉन्सन म्हणाले की,”त्यांना सिनेटमध्ये विधेयकात कमीत कमी बदल हवे आहेत, जेणेकरून संतुलन राखले जाईल.मात्र, जर सिनेटने टप्प्यावर विधेयक बदलले, तर ते मतदानासाठी प्रतिनिधी सभागृहात आणले जाईल.”

मस्क हे ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल बिलावर नाराज असल्याचेही सांगितले जात होते. एलॉन मस्क यांचे निघणे अशा वेळी आले आहे जेव्हा त्यांनी ट्रम्पच्या बिग अँड व्ह्यूटिफुल बिलावर टीका केली आहे. मला वाटते की बिल मोठे असू शकते किंवा ते उत्कृष्ट असू शकते. परंतु मला वाटत नाही की ते एकाच वेळी दोन्ही असू शकेल, असे मस्क यांनी म्हटले होते. यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर यावर ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये सांगितले की, मी त्यातील काही भागांवर खूश नाही, परंतु पुढे काय होते ते आपण पाहू.”

डीओजीई चे काम पाहिल्यामुळे मस्क यांना त्यांच्या व्यवसायावर लक्ष देता येत नव्हते. मस्क यांनी १३० दिवस अमेरिकन सरकारमध्ये विशेष कर्मचारी म्हणून काम केले.या काळात टेस्लाला खूप मोठा फटका बसला आहे. मस्क यांच्या कंपनीच्या कारची विक्री मंदावली होती.विक्री गडगडलेली असताना शेअर्सही कोसळलेले आहेत.

You Might Also Like

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक
Next Article सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?