Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/04/03 at 11:57 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.)। : उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सिंहगड शासकीय निवासस्थान येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, त्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

संचालक पी. एन. जुमले म्हणाले की, पूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच ॲप्रेटीसशिप उपलब्ध होती. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनाही ॲप्रेंटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.

You Might Also Like

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार – आशिष शेलार
Next Article वीजदरांमधील कपातीला तूर्तास स्थगिती, देयके जुन्याच दराने

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?