Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भंगारवाल्याने जनरेटरची वायर चोरल्याने रुग्णालयातील 60 बालकांचा जीव धोक्यात, अनर्थ टळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

भंगारवाल्याने जनरेटरची वायर चोरल्याने रुग्णालयातील 60 बालकांचा जीव धोक्यात, अनर्थ टळला

Surajya Digital
Last updated: 2022/05/21 at 6:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सोलापूर : एका भंगारवाल्याने लहान मुलांच्या रुग्णालयातील जनरेटरची बॅटरी चोरण्यासाठी वायर तोडल्याने रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील वीजच गायब झाली. यामुळे या विभागातील ६० हून अधिक बालकांचा जीव धोक्यात आला होता. मात्र डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून वीजपुरवठा सुरळीत केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. Bhangarwala steals generator wire, endangers lives of 60 hospital children

 

सोलापूर जिल्ह्यात प्रसिध्द असणाऱ्या पंढरपूर येथील डॉ. शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात हा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपी भारत सुखदेव माने (रा. सेंट्रल नाका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. माने हा भंगार गोळा करणारा आहे.

बुधवारी (ता.18) दुपारी दोनच्या सुमारास रुग्णालयातील जनरेटरचा आवाज येऊ लागल्याने कर्मचारी युवराज सावंत हा पाहण्यासाठी गेला असता संशयित आरोपी जनरेटरची स्टार्टर बॅटरी काढून पळत असल्याचे दिसून आले. सदर बॅटरी चोरण्यासाठी त्याने विजेच्या वायरी तोडल्या होत्या. यामुळे वीज गायब झाली. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करताच त्याने झुडपातून धूम ठोकली.

मात्र वीज गेल्याने अतिदक्षता विभागातील ६० हून अधिक लहान मुलांच्या जीवाल धोका निर्माण झाला होता. माहिती मिळताच डॉ. शहा व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वायरी जोडल्या, नवीन बॅटरी लावली. यामुळे काही मिनिटांतच वीज सुरू झाली. या काही मिनिटांच्या थरारामध्ये बालकांच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले होते. तसेच रुग्णालयातील डॉक्टरदेखील घाबरले होते. समयसूचकतेमुळे या बालकांचे प्राण वाचले. आरोपी भारत माने यास अटक करण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

□ नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बार्शी :  नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी  तानाजी घायाळ (रा. सिद्धेश्वर वडगाव ता. जि. उस्मानाबाद ) याच्याविरोधात  वैराग पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली.   शेजारच्या  तालुक्यातील पीडिता  मामाच्या गावी राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. मामाच्या घरी झालेल्या एका कार्यक्रमात तिची आरोपी बरोबर ओळख झाली. आरोपीने ओळख वाढवत भेटीगाठी सुरु केल्या.

डिसेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये त्याने मुलगी शिकत असलेल्या महाविद्यालयामध्ये जावून तिला  मोटरसायकलवर बसवून गाव तळ्याच्या काठी नेऊन जबरदस्तीने दुष्कर्म केले.  हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता भीतीपोटी गप्प राहिली. त्याचा फायदा घेवून त्याने पुन्हा तसाच प्रकार केला.

 

मार्च २०२२ मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर पीडिता आपल्या गावी आई – वडिलांकडे गेली. त्यानंतर  तिने पोटात दुखत असल्याची तक्रार आपल्या आईकडे  केली  तिची सोनोग्राफी केली ती १५ आठवड्याची गरोदर असल्याची बाब उघड झाली त्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे करीत आहेत.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Bhangarwala #solapur #steals #generator #wire #endangers #lives #hospital #children, #भंगारवाला #जनरेटर #वायर #चोर #रुग्णालय #बालक #जीव #धोक्यात #अनर्थ #टळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Monkeypox परदेशात मंकीपॉक्सचा धोका, विमानतळावर आरोग्य अधिकारी सतर्क, अलर्ट जारी
Next Article केंद्र सरकार देणार घरगुती गॅसवर सबसीडी; पेट्रोल – डिझेलही होणार थोडे स्वस्त

Latest News

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?