Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘गोकुळ शुगर’ चे चेअरमन दत्ता शिंदेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

‘गोकुळ शुगर’ चे चेअरमन दत्ता शिंदेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

Surajya Digital
Last updated: 2022/11/25 at 4:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● मुंबईत अजित पवार यांची घेतली भेट

 

Contents
● मुंबईत अजित पवार यांची घेतली भेटस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

• अक्कलकोट : धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला असून एक महिन्याच्या आतच त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. लवकरच कार्यकर्ता आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. Ajit Pawar meet , confirmed the entry of ‘Gokul Sugar’ chairman Dutta Shinde into the Nationalist Party

 

बुधवारी (ता. 23) मुंबईत गोकुळ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ३० नोव्हेंबरनंतर पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित केली जाईल. त्यानंतर मुंबईत अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होईल, अशी माहिती देण्यात आली.

 

गेल्या काही दिवसांपासून गोकुळ शिंदे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाबाबत अक्कलकोट तालुक्यात जोरदार चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी त्यांनी उस्मानाबाद येथे पवार यांची भेटही घेतली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री अचानक थेट पवार यांचा शिंदे यांना फोन आल्याने ते बुधवारी मुंबई भेटीस गेले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

या बैठकीत अक्कलकोट तालुक्याच्या आगामी राजकारणावझर सविस्तर चर्चा झाली असल्याचे कळते. या भेटीदरम्यान अक्कलकोटमधील प्रलंबित एकरूख उपसा सिंचन योजना, बस स्टॅन्ड, कारखाने, ग्रामीण भागातील रस्ते, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, भाविकांना मिळणाऱ्या सुविधा, जिल्हा परिषद मतदार संघनिहाय समस्या सोडवण्यासाठी शिंदे यांनी पवार यांना निवेदन दिले. नंतर पवार यांनी शिंदे यांना कामाला लागण्याची सूचना केली.

 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर माजी उपमुख्यमंत्री, तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फोकस केले आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट मतदार संघातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शिंदे यांना निमंत्रित केले होते. या बैठकीनंतर शिंदे यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर चर्चा झाल्याचे समजते.

गोकुळ शिंदे हे सध्या गोकुळ शुगरचे अध्यक्ष आहेत. अनेक वर्ष त्यांचे घराणे राजकारणात आहे. साखर उद्योगात त्यांचे नाव आहे. दहिटणे (तालुका अक्कलकोट) हे त्यांचे मूळ गाव असून ते जेष्ठ नेते बलभीम भाऊ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. मुंबईतील भेटीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, सर्व कार्यक्रम ठरलेला आहे. लवकरच आम्ही तारीख जाहीर करू आणि कामाला लागू. यानिमित्त अक्कलकोटमध्ये भव्य कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, अमोल व्हटकर आदी उपस्थित होते.

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #AjitPawar #confirmed #entry #GokulSugar #chairman #DuttaShinde #NationalistParty #ncp, #गोकुळशुगर #चेअरमन #दत्ताशिंदे #राष्ट्रवादी #प्रवेश #निश्चित #अजितपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापालिकेत तब्बल 1125 कर्मचारी – अधिकाऱ्यांची पदे रिक्त !
Next Article सोलापूरच्या ‘कीर्ती’ने केली जागतिक कीर्ती; मुंबईकरांकडून प्रशंसा

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?