नांदेड, २९ ऑगस्ट. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवली असून, भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. असे भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार जय अशोकराव चव्हाण यांनी आज सांगितले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी देखील जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले तसेच मुखेडचे आमदार डॉ. तुषारजी राठोड व देगलूरचे आमदार जितेशजी अंतापूरकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. अशी माहितीीही त्यांनी दिली.
जिल्हा प्रशासन सतर्क आहे. मात्र, नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आमदार चव्हाण यांनी यावेळी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क करावे कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.
