परभणी, ७ ऑगस्ट –
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी परभणी जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुर्राणी यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, रविराज देशमुख आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.