Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी; वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी; वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2020/09/03 at 8:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देता यावी, असा आमचा आग्रह होता. या आग्रहाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिली आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकरदेखील उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

घरात बसून परीक्षा घेण्याच्या पद्धती तीन ते चार प्रकारच्या आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, MCQ असे अनेक प्रकार आहेत. याबाबत अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होणार आहे. हा अहवाल उद्या शुक्रवारी शासनाकडे प्राप्त होईल. उद्या शासनाकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणतीही मुदत न घेता तो अहवाल तातडीने विद्यापीठांकडे पाठवू”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन युजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करु. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही यूजीसीकडे देऊ”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही कुलगुरुंना केल्या आहेत. आज कुलपती म्हणून राज्यपालांनीदेखील त्याच सूचना कुलगुरुंना केल्या आहेत.

आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेणार, याबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

* आॕक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करु. पण विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असं गृहित धरायला हरकत नाही”, असं उदय सामंत यांनी सांगितले.

15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याचं नियोजन कुलगुरु घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जावं लागू नाही, अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रकारे अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाची माहिती उद्या दिली जाईल”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #घरातून #परीक्षा #मंजुरी #राज्यपाल #निकाल #मुख्यमंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिवंगत आरआर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील कोरोना पाॅझिटिव्ह
Next Article “पंतप्रधान मोदी फक्त चार तासच झोपतात, मुख्यमंत्री ठाकरेंनी किमान तेवढा वेळ तरी काम करावे”

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?