Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रश्नपत्रिका जळाल्याने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

प्रश्नपत्रिका जळाल्याने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल

Surajya Digital
Last updated: 2022/02/24 at 6:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु होणार आहेत. पण बारावीचे ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला संगमनेर तालुक्यात आग लागली होती. त्यामुळे वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला. बाकीच्या पेपर नियोजनात कोणताही बदल झालेला नाही.

बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे. तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. काल बुधवारी (२३ फेब्रुवारी) प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत.

दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. A slight change in the schedule of 12th standard examination due to burning of question papers

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च रोजी सुरू होणार आहे. पण यातील ५ मार्च रोजी होणारा पेपर आता ५ एप्रिल रोजी, तर ७ मार्च रोजी होणारा पेपर ७ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काल बुधवारी पुणे – नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. जळून खाक झालेल्या प्रश्नपत्रिका याच विषयांच्या असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्याची नामुष्की बोर्डावर आली आहे.

५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. हे पेपर आता ५ एप्रिल रोजी होणार आहेत.

७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता. ते आता ७ एप्रिल रोजी होतील.

You Might Also Like

इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार – मुख्यमंत्री

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

TAGGED: #slight #change #schedule #12th #standard #examination #burning #question #papers, #प्रश्नपत्रिका #जळाल्या #बारावी #परीक्षा #वेळापत्रकात #थोडा #बदल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जयंत पाटलांचा सत्कार, वाले – बरडेेंवर स्वकियांकडूनच टीका; प्रभाग रचनेवरील हरकतीवर उद्या सुनावणी 
Next Article राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, महावितरणचे कार्यालय पेटविले

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?