Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 14 वर्षांनंतरही करार कागदावरच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 14 वर्षांनंतरही करार कागदावरच

Surajya Digital
Last updated: 2022/08/22 at 1:38 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ 14 वर्षांनंतरही करार कागदावरचस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ न्यायालयात धाव घेतल्याने प्रोजेक्ट ठप्प□ रकमेचा घरे घेण्यासाठी वापर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. त्यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. Shiv Sena leader Sanjay Raut’s jail term extended, agreement remains on paper even after 14 years

 

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज (22 ऑगस्ट) संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार का त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आजच्या सुनावणीकडे शिवसेनेचे लक्ष होते. दरम्यान, राऊत हे सध्या आर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांचा मुक्काम वाढला आहे.

पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना कोर्टात हजर केले. संजय राऊत हे हातात कागदपत्रे घेऊन आले होते. त्यांचा आज पेहराव बदलेला होता. झब्बा घालून राऊत कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणीस सुरुवात केली. त्यानंतर राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

□ 14 वर्षांनंतरही करार कागदावरच

 

पत्रा चाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GAPCL) ने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

पत्रा चाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तिघांमध्ये झालेल्या करारानुसार जीएपीसीएल चाळीच्या 672 भाडेकरूंना नवीन घर देईल, तसंच म्हाडासाठी घरं बांधेल आणि उरलेली जागा खासगी विकासकाला विकेल. पण इडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांच्या जवळचे असणाऱ्या प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी 672 भाडेकरूंपैकी एकासाठीही घर उभारलं नाही. उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने द मिडोस या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली.

 

□ न्यायालयात धाव घेतल्याने प्रोजेक्ट ठप्प

 

जीएपीसीएलकडून भाडं भरलं जात नसल्याची तसंच प्रोजेक्टला उशीर होत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून करण्यात येऊ लागली, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. जीएपीसीएल प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं भाडं भरेल, असं करारात नमूद करण्यात आलं होतं, पण जीएपीसीएलने 2014-15 पर्यंतच भाडं भरलं.

याच काळात जीएपीसीएलने भाडेकरूंसाठी एकही घर न उभारता 9 खासगी विकासकांना एफएसआय विकला. जानेवारी 2018 साली म्हाडाने भाडं न भरल्यामुळे आणि इतर अनियमिततांचं कारण देत जीएपीसीएलला टर्मिनेशनची नोटीस पाठवली, पण तेव्हाच जीएपीसीएलकडून एफएसआय विकत घेतलेल्या 9 खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यामुळे प्रोजेक्ट ठप्प झालं.

 

□ रकमेचा घरे घेण्यासाठी वापर

 

इडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले, हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत, ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितलं. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले.

वर्षा यांनी ही रक्कम दादरमध्ये घर विकत घेण्यासाठी केला, असा दावा इडीने केला आहे. इडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केले. ‘याच काळात अलिबागमध्ये किहीम बिचजवळ वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने 8 प्लॉट विकत घेण्यात आले. यातल्या स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #ShivSena #leader #SanjayRaut's #jail #term #extended #agreement #remains #paper #14years, #शिवसेना #नेते #संजयराऊत #तुरुंग #मुक्काम #वाढला #14 वर्षांनंतरही #करार #कागदावरच #पत्राचाळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधी शेवटपर्यंत नकारावर ठाम राहिले तर काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ही नावे चर्चेत
Next Article डॉक्टरांना ‘डोलो’ची लाच; कंपनी म्हणते ‘सेल्स प्रमोशन’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?