Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा प्रथमच विदेश दौरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा प्रथमच विदेश दौरा

admin
Last updated: 2025/05/19 at 5:45 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 19 मे (हिं.स.)।’ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे युरोपच्या सहा दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होत आहेत. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तीन देशांच्या नेत्यांशी ते राजनैतिक, सामरिक आणि आर्थिक सहकार्याबाबत चर्चा करणार असून, विशेषत: पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी (दि.१८) अधिकृत माहिती देताना सांगितले की, जयशंकर यांचा हा दौरा १९ ते २४ मे दरम्यान पार पडणार आहे. हे दौरे केवळ द्विपक्षीय संबंधच मजबूत करतील असे नाही, तर भारताच्या जागतिक धोरणात्मक उपस्थितीलाही नवे परिमाण देणार आहेत.जयशंकर यांचा जर्मनीचा दौरा जर्मनीच्या नव्या चांसलर फ्रेडरिक मर्झ यांच्या नियुक्तीनंतर होत आहे. जयशंकर यांची ही भेट दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष, हरित ऊर्जा आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर निर्णायक ठरणार आहे.

पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर १० मे रोजी दोन्ही देशांनी संघर्षविराम स्वीकारला. या कारवाईमागील पार्श्वभूमी, उद्देश आणि यशस्वी अंमलबजावणीची माहिती जयशंकर हे युरोपमधील आपल्या समकक्षांना देणार आहेत. या माध्यमातून भारत जागतिक व्यासपीठावर दहशतवादविरोधी आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे मांडण्याच्या तयारीत आहे.पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी भारताविरुद्ध झालेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी दहशतवादाविरोधातील लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तिन्ही देशांनी भारतातील हिंसाचाराविषयी सहानुभूती व्यक्त केली असून, या दौऱ्याच्या माध्यमातून त्या भावनांना राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याच्या स्तरावर अधिक स्पष्ट आकार दिला जाणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकव्याप्त काश्मीर भारताकडे द्यावा, अन्यथा युद्ध अटळ – रामदास आठवले
Next Article सोलापूर : पर्समधील दहा तोळ्यांचे दागिने केले लंपास

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?