बीजिंग, 15 जुलै (हिं.स.) :
गेल्या
काही वर्षांपासून भारत आणि चीनमधील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवरएक सकारात्मक चित्र समोर आले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बीजिंगमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
घेतली. शांघाय सहकार्य संघटना अर्थातच एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान
ही भेट झाली. सीमेवरील अलिकडच्या तणाव कमी झाल्यानंतर जयशंकर यांनी शी जिनपिंग
यांच्याशी थेट संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ होती.
परराष्ट्र
मंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या वतीने शी जिनपिंग यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारत-चीन द्विपक्षीय
संबंधांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांबद्दलही माहिती दिली. त्यांनी
लिहिले की, दोन्ही देशांच्या नेत्यांचे मार्गदर्शन
या संदर्भात खूप महत्वाचे आहे आणि ते संबंधांना एक नवीन दिशा देण्यास मदत करत आहे.
जयशंकर
यांनी सोमवारी एससीओ बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय
चर्चा केली. या संभाषणात त्यांनी सांगितले की, गेल्या
९ महिन्यांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये ‘चांगली
प्रगती’ झाली आहे. विशेषतः सीमेवरील तणाव कमी
झाला आहे आणि शांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी असेही म्हटले की, आता
दोन्ही बाजूंनी तणाव कमी करणे आणि इतर प्रलंबित समस्या सोडवण्याची गरज आहे.
एससीओच्या
बैठकीत जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
ते म्हणाले की, एससीओचे मूळ उद्दिष्ट दहशतवाद, फुटीरतावाद
आणि अतिरेकी यांच्याशी लढणे आहे आणि सर्व सदस्य देशांनी ‘शून्य सहनशीलता’च्या धोरणाचे पालन केले पाहिजे. याशिवाय, पाच वर्षांपासून बंद असलेली कैलास मानसरोवर
यात्रा पुन्हा सुरू करण्याच्या चीनच्या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले.
