Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानामधील व्यवसाय बंद करण्याची फेसबुक – गुगलची धमकी, राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोक्याचे कृत्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

पाकिस्तानामधील व्यवसाय बंद करण्याची फेसबुक – गुगलची धमकी, राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोक्याचे कृत्य

Surajya Digital
Last updated: 2020/11/24 at 8:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

इस्लामाबाद : इंटरनेट, सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या मजकुराबाबत पाकिस्तान सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. या नव्या नियमावलीमुळे फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर उपलब्ध असलेली माहिती, मजकूर सेन्सॉर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतेमुळे आता फेसबुक, गुगल आणि ट्विटरने पाकिस्तानमधील व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.

हे नवीन नियम इस्लामिक राष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोखण्याचे प्रयत्न करण्याच्या उद्देश्याने लागू करण्यात आले असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे. इम्रान खान सरकारकडून याबाबत कोणतीही भूमिका व्यक्त करण्यात आली नाही. सरकारचे नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोशल मीडियावरील पाकिस्तान विरोधी, अश्लील, सांप्रदायिकता वाढवणारे मजकूर, साहित्य हटवण्यास बराच वेळ लागत होता. त्यामुळे हे नवीन नियम तयार करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर २४ तासांमध्ये संबंधित मजकूर हटवणे बंधनकारक असणार आहे.

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना पाकिस्तानच्या तपास यंत्रणांना डिक्रिप्टेड, समजून घेता येईल अशी माहिती अथवा डेटासह देणे बंधनकारक असणार आहे. सोशल मीडियाचे कार्यालय, व्यवसाय पाकिस्तानमध्ये असावेत अशी पाकिस्तान सरकारची इच्छा आहे. मात्र, सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नव्या नियमांमुळे पाकिस्तानच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होणार असून जगातील इतर भागांमध्ये पोहचण्याची क्षमता कमी होणार असल्याचे कंपन्यांनी म्हटले. नव्या नियमांमुळे पाकिस्तानी युजर्सना आणि व्यवसायांना आपली सेवा उपलब्ध करणे सोशल मीडिया कंपन्याना कठीण जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

* राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोक्याचे कृत्य

पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने शासकीय माध्यमं नियामकांना अधिकाधिक अधिकार दिले आहेत. त्यानंतर आशिया इंटरनेट अलायन्सने गुरुवारी व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला. पाकिस्तान सरकारच्या या नव्या नियमांमुळे इंटरनेट कंपन्यांना लक्ष्य करण्यात येणार आहे. त्याशिवाय सरकारकडून यासाठी अपारदर्शक प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. नवीन नियमांतर्गत इस्लामचा निषेध करणार्‍या, दहशतवादाला चालना देण्यासाठी, द्वेषयुक्त भाषा, अश्लील साहित्य किंवा अशा आशयाचे साहित्य आढळून आल्यास ३.१४ मिलियन डॉलरचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याशिवाय हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोक्याचे असल्याचे समजण्यात येणार आहे.

You Might Also Like

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным

Почему мы нравится мониторить за чартами

По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью

Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland

Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen

TAGGED: #पाकिस्तानामधील #व्यवसाय #बंदकरण्याची #फेसबुकगुगलची #धमकी #राष्ट्रीय #सुरक्षितेसाठी #धोक्याचे #कृत्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवे अभियान ‘कर्म मराठा, धर्म मराठा, जोडो मराठा’; इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी
Next Article पंतप्रधान मोदींकडे केली मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजप नेत्यांची तक्रार

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?