Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने घातली बंदी; राजासिंह यांनीही दिले प्रत्युत्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशTechनिक

आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने घातली बंदी; राजासिंह यांनीही दिले प्रत्युत्तर

Surajya Digital
Last updated: 2020/09/03 at 7:02 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशभरात सोशल मीडियात अव्वल असलेल्या फेसबुकवर भाजपची पाठराखण केल्याचा गंभीर आरोप देशातील विरोधी पक्षातून केला जात होता. भडकावू भाषण प्रकरणात कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोपानंतर फेसबुकने भाजपा आमदारावर कठोर कारवाई केली आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.

तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. द्वेष व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आशयावरील फेसबुकच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप नेत्यावर बंदी घातली आहे. फेसबुक प्रवक्त्याने ई-मेल निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या व्यासपीठावर हिंसा आणि द्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे.

ते म्हणाले की संभाव्य उल्लंघन करणार्‍यांना शोधून काढणे आणि त्याची मूल्यांकन करण्याची प्रक्रिया “व्यापक” असून याअंतर्गत फेसबुकने त्यांचे खाते हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

फेसबुककडून भाजप आमदारांवर अशावेळी कारवाई करण्यात आली आहे जेव्हा त्यांच्यावर द्वेषयुक्त सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी भारतात प्रचंड राजकीय दबाव येत आहे. बुधवारी फेसबुकचे अधिकारी माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले. यावेळी, द्वेष पसरविणार्‍या पदाला राजकीयदृष्ट्या समर्थन देण्याच्या आरोपाशी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्नांचा सामना करावा लागला. या समितीचे अध्यक्ष हे काँग्रेस खासदार शशी थरूर आहेत.

आमदार टी राजा सिंह यांनी मागील महिन्यात ट्विटरवरील व्हिडिओमध्ये दावा केला होता की, त्यांच्याकडे अधिकृत फेसबुक पेज नाही. ते म्हणाले, फेसबुक पेज माझ्या नावाने वापरली जात आहे याची मला माहिती मिळाली होती. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की माझ्याकडे अधिकृत पेज नाही. मी कोणत्याही पोस्टसाठी जबाबदार नाही.

सिंग यांनी जातीयवादी पोस्टशी संबंधित चर्चा फेटाळून लावत दावा केला होता की २०१८ मध्ये त्यांचे अधिकृत अकाउंट फेसबुक खाते हॅक होऊन ब्लॉक झाले होते. अमेरिकेच्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने फेसबुकवरील आपल्या अहवालात सूत्रांच्या अहवालाने सांगितले होते की, फेसबुक इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी अंतर्गत संदेशात राजा सिंह यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्यास विरोध केला होता. याचा परिणाम भारतातील कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे अहवालात म्हटले होते.

* फेसबुक वापरण्याचा मला हक्क

वादग्रस्त ठरलेले भाजपा आमदार टी राजा सिंग यांच्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. द्वेषयुक्त सामग्री प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून फेसबुकने ‘धोकादायक व्यक्ती’ असा त्यांचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे फेसबुकने कारवाई केल्यानंतर टी राजा सिंग यांनी आपण गेल्या एक वर्षांपासून फेसबुकवर नसल्याचा दावा केला आहे. आपण एक वर्षांपूर्वी फेसबुक सोडलं आहे असा दावा करताना टी राजा सिंग यांनी फेसबुक काँग्रेसच्या दबावाखाली काम करतंय का ? अशी शंकाही उपस्थित केली आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. मी फेसबुकला अधिकृत अकाऊंट सुरु करण्यासाठी लिहिणार आहे. फेसबुक वापरताना मी सर्व नियमांचं पालन करेन. फेसबुक वापरण्याचा हक्क आपल्याला दिला पाहिजे आणि त्यासाठी मी परवानगी मागणार आहे,” असं टी राजा सिंग यांनी सांगितलं आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #टीराजासिंह #फेसबुकबंदी #प्रत्युत्तर #हक्क
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अ.भा. ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रोहिणी तडवळकर यांची निवड
Next Article दिवंगत आरआर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?