Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले तर अशांना ब्लॉक करू शकतो; फेसबुक, यूट्यूबनी बाजू मांडली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले तर अशांना ब्लॉक करू शकतो; फेसबुक, यूट्यूबनी बाजू मांडली

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 4:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : न्यायालयाने वा केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आदेश दिले, तर आम्ही राजकीय पक्षाचे समर्थन करणाऱ्याला ब्लॉक करू शकतो, अशी भूमिका फेसबुक व यूट्युब न्यायालयात मांडली आहे. फेसबुक, यूट्युबवर वादग्रस्त व्हिडीओसंदर्भात फेसबुक आणि यूट्युबनं मुंबई उच्च न्यायालयात ही महत्त्वाची माहिती दिली.

फेसबुक व यूट्युबच्या वतीनं दारूस खंबाटा आणि नरेश ठाकर यांनी बाजू मांडली. माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत केंद्र सरकारला तसे आदेश देण्याचे अधिकार आहेत, अशी माहिती फेसबुकने न्यायालयाला दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘एआयएमआयएम’ पक्षाचा समर्थक असलेल्या अबू फैजल नावाच्या व्यक्तीविरोधात मुंबईतील रहिवाशी इम्रान मोईन खान यांनी याचिका दाखल केली आहे. अबू फैजलने दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे व्हिडीओ अपलोड केला असून, त्यांना फेसबुक, यूट्युबवर ब्लॉक करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. माधव जमादार यांच्या खंठपीठासमोर सुनावणी सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने अबू फैजलने अपलोड केलेला व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश फेसबुक-यूट्युबला दिले होते. त्याचबरोबर या प्रकरणात मुंबई पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली.

अबू फैजल याने अपलोड केलेला व्हिडीओ डिलिट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ डिलिट केल्यानंतर ‘एमआयएम’चा समर्थक असलेल्या फैजल आणखी जास्त व्हिडीओ अपलोड करत आहे असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर न्यायालयाने अथवा केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आदेश दिले, तर फेसबुक त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकते. माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत केंद्र सरकारला तसे आदेश देण्याचे अधिकार आहेत, अशी माहिती फेसबुकने न्यायालयाला दिली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #मुंबईन्यायालय #माहितीतंत्रज्ञान #कायद्यानुसार #फेसबुक #यूट्यूब
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “नातवांची मागणी आजोबाला आवडली का माहित नाही मात्र न्यायालयाने ग्राह्य धरली”
Next Article चार वर्षापासून निकालाची प्रतीक्षा करणा-या मंगळवेढेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हाती मिळणार निकाल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?