Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बंद अवस्थेतला ‘धाराशिव’ कारखाना केला केवळ एका महिन्यात सुरू : सहकारमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

बंद अवस्थेतला ‘धाराशिव’ कारखाना केला केवळ एका महिन्यात सुरू : सहकारमंत्री

Surajya Digital
Last updated: 2021/10/18 at 8:58 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४ (सांगोला सहकारी साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. केवळ एक महिन्यात बंद अवस्थेतला कारखाना केला सुरू केल्याचे सांगत अभिजित पाटील यांचे कौतुक केले.

हा कारखाना कुणीही चालवायला घेत नव्हते, परंतु अभिजित पाटील यांनी तीन कारखाने यशस्वीपणे चालवल्याचा अनुभव सोबत घेऊन सांगोला कारखाना चालविण्यासाठी घेण्याचे धाडस दाखवले आहे. त्याची धडाडी आणि सहकार क्षेत्रातील असलेला दांडगा अनुभव असल्याने कारखाना चालू केला. अभिजित पाटलांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसांत आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर तो सुरू केला.

सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. त्यांनी त्यांचे इतर तीन कारखाने ज्या चांगल्या पद्धतीने चालवले तसेच हा कारखाना चालवतील व शेतकऱ्यांना योग्य मोबदला देतील, अशी अपेक्षा सहकार मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप झाले पाहिजे त्या दृष्टीने कारखान्याने नियोजन करावे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून, शेतीला पाणी कमी पडणार नाही, तरीही शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, ठिंबकद्वारे शेतीला पाणी द्यावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास निश्चित मदत होईल. हा कारखाना चालू करण्यासाठी दिपक आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी हा कारखाना चालू करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले की या कारखान्यासाठी ऊस देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर दिला जाईल. तसेच सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी भविष्यात को-जन डिसलेरी भविष्यात उभारली जाईल असे सांगितले.तसेच कारखान्याचे यंदाच्या वर्षी ५ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट असून उत्पादीत होणारी साखर परदेशात पाठवली जाईल असेही त्यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी कारखान्याचे धुराडे काल अखेर पेटले आहे. पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी बंद अवस्थेत असलेला सांगोला कारखाना सुरु करुन पंढरपूर व सांगोला तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी दिली आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांनी कारखाना एक महिन्याच्या आत चालू केल्याने अभिजित पाटील यांचे आभार मानले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते.  सांगोला व पंढरपूर तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक शेतकरी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Covered #Dharashiv #factory #started #Co-operation #Minister, #बंद #अवस्थेत #धाराशिव #कारखाना #एकामहिन्यात #सुरू #सहकारमंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिवाळीनंतर एका लसीच्या डोसनंतर सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार!
Next Article पावसाचं थैमान, 26 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता, जनतेला आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?