Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महावितरणने महापालिकेवर खापर फोडण्यापेक्षा वस्तुस्थिती पहावी : महापालिका आयुक्त 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महावितरणने महापालिकेवर खापर फोडण्यापेक्षा वस्तुस्थिती पहावी : महापालिका आयुक्त 

Surajya Digital
Last updated: 2023/04/26 at 4:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : पाणीपुरवठा व वीज पुरवठा या महत्त्वपूर्ण सेवा आहेत. महापालिका आणि महावितरण या दोन्हीही शासकीय संस्था असून त्या अनुषंगाने जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. महापालिकेवर खापर फोडण्यापेक्षा महावितरणने वस्तूस्थिती पाहिली पाहिजे, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिले. Mahavitaran should look at the facts instead of criticizing the Municipal Corporation: Municipal Commissioner Solapur water shortage

 

सोलापूर मनपा प्रशासन वीजपुरवठ्यातील व्यत्ययाचे कारण पुढे करुन महावितरणवर खापर फोडत आहे. मात्र महावितरणने या महापालिकेच्या अंतर्गत विस्कळीतपणासाठी महावितरण वर केलेल्या आरोपाचे खंडन करत बिघाडासाठी महावितरणला जबाबदार धरू नये, असे प्रसिद्धी पत्रक महावितरणने काढले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या, महावितरण कंपनीने या प्रकरणी वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. किती वेळा वीज पुरवठा खंडित झाला. या संदर्भातली आकडेवारी यापूर्वी महापालिकेत झालेल्या बैठकीत सादर करण्यात आली आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंतांनीही वस्तुस्थिती मान्य केली आहे. दोन्हीही शासकीय विभाग आहेत. पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत ठेवणे महत्वाची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजपुरवठा महत्त्वाचा ठरतो आणि त्याच व्यत्यय झाला तर पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यामुळे अखंडित वीजपुरवठा महत्त्वाचा आहे, असेही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

दरम्यान, आढेगाव येथील पर्यायी सब स्टेशनसाठी इस्टिमेट तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचीही कार्यवाही लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

○ कर्नाटकाकडून पाणी चोरीचा अहवाल जलसंपदा विभागाकडे पाठविला !

 

कर्नाटकाकडून औज बंधाऱ्यातील अनधिकृत पाणी चोरीचा अहवालावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शितल तेली – उगले, जलसंपदा विभागाचे अभियंता यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. तो अहवाल पुढे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आला आहे. आंतरराज्य विषय असल्याने प्रधान सचिव स्तरावरच यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.

 

 

○ स्काडा: एएमटी कंपनीच्या मुदतवाढी संदर्भात चर्चा

 

 

पाणीपुरवठा संदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या स्काडा प्रणालीचे काम संबंधित मुदत संपल्याने एएमटी कंपनीचे थांबवले आहे. या कंपनीला मुदतवाढ देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. किती पैसे द्यायचे यासंदर्भात नियम अटी तपासून पाहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे महापालिका आयुक्त शितल तेली- उगले यांनी सांगितले.

 

○ खोदलेले रस्ते सपाटीकरणासाठी टेंडर काढले

 

सोलापूर शहरात विविध ठिकाणी रिलायन्स कंपनी व गॅस कंपनीकडून खोदाईचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. लोकांना याचा त्रास होत आहे. रिलायन्स कंपनीने यापूर्वीच खोदाईचे व सपाटीकरणाचे पैसे भरलेले आहेत तेव्हा आता हे खोदलेले रस्ते सपाटीकरण करण्यासाठी झोनवाईज टेंडर काढण्यात आलेले आहे. लवकरच हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असेही महापालिका आयुक्त शितल तेली -उगले यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mahavitaran #lookatthefacts #instead #criticizing #Municipal #Corporation #MunicipalCommissioner #Solapur #watershortage, #महावितरण #महापालिका #खापर #फोडण्यापेक्षा #वस्तुस्थिती #महापालिका #आयुक्त #तेलीउगले, #सोलापूर #शहर #पाणीटंचाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा आमदार प्रणिती शिंदे यांना टोला
Next Article सोलापुरात तब्बल ५०० एकर जागेत भव्य उद्यान उभारण्यासाठी मान्यता

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?