Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: संजयमामा अजितदादांच्या मागे बबनदादा फडणविसांच्या मागे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

संजयमामा अजितदादांच्या मागे बबनदादा फडणविसांच्या मागे

Surajya Digital
Last updated: 2023/03/21 at 6:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● विधानसभेतील बसण्यावरून राज्यात आ.शिंदे बंधुची चर्चास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● विधानसभेतील बसण्यावरून राज्यात आ.शिंदे बंधुची चर्चा

कुर्डूवाडी- हर्षल बागल

सुरू असलेल्या अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात राज्याने जे पाहिले त्यावर सर्वांच्याच  भुवया ऊंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील बाकावर बसलेले पाहिले गेले. Behind Sanjaymama Ajitdad Babandada Devendra Fadnavis Behind Sanjay Shinde Babanrao Shinde Convention Political तर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या मागील बाकावर बसलेले दिसले. यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा निमगावच्या शिंदे बंधुची चर्चा होत आहे.

 

इडीच्या कारवाईने ग्रस्थ असलेले माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिल्लीश्वरेच्या वाऱ्या केलेल्या हे काय लपुन राहिले नाही. अधून मधून देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने भाजप प्रवेशाला फोडणीही टाकली जाते. तर आ. बबनदादांचे बंधू आ. संजयमामा शिंदे हे मात्र आपले राजकीय सर्वस्व मानलेल्या अजितदादांच्या मागे बाकावर बसल्याचे दिसले.

एक भाऊ राष्ट्रवादीत तर एक भाऊ फडणविसांच्या मागे बसल्याने भाजपाच्या वरदहस्तात ही पाच वर्ष घालवणार असे पक्के दिसत आहे. आ. शिंदे बंधु च्या राजकारणाचा वेध अद्याप जिल्ह्यात तरी कुणाला टिपता आला नाही. राज्यात सरकार कुणाचेही असु द्या आपल्या मतदार संघात दोघेही आ. शिंदे बंधु निधी लुटण्यात माहिर आहेत. अगदी फडणवीस सरकारने स्थगिती आणलेल्या योजना देखील सुरु करण्याचा मनसुबा आ. संजयमामा शिंदे यांचा आहे. तर दुसऱ्या बाजुला जी कामे होत नाहीत ती कामे फडणविसांच्या मागे बसून करुन घेण्यात आ. बबनदादा वाकिब आहेत.

 

 

● मोहिते – पाटलांचे करमाळा माढ्यात वाढते दौरे

 

अकलूजच्या मोहिते पाटलांचे करमाळा व माढा मतदारसंघात वाढते दौरे हे जरी लोकसभा मिशन असले तरी दोन्ही आ. शिंदे बंधुना धोकादायकच आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

आजच्या विधानसभेतील बसण्याच्या जागेमुळे मोहिते पाटिल देखील बुचकाळ्यात पडले असतील की आ. शिंदे बंधुचा नक्की पक्ष कोणता. भाजपात प्रवेश केला आत्ता येथेही आ. शिंदे फडणविसांच्या जवळ गेल्याने मोहिते पाटलांचे दौरे वाढले असले तरी याचा फारसा काही ऊपयोग होईल असं वाटत नाही.

● सत्ता कुणाचीही असो माझ सरकार अजितदादाच

राज्यात सत्ता भाजपाची असो की काँग्रेस राष्ट्रवादीची आणखी सेनेची असो … माझ्यासाटी सरकार फक्त अजितदादा पवार आहेत असे बेधडक पणे वक्तव्य करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले होते. याचाच प्रत्यय बसण्याच्या जागेवरून आला, असं म्हणावे लागेल.

● विधानसभेतच काय दिल्लीत सुध्दा मतदार संघातील कामांसाटी जाऊ

आज मी जे फडणविसांच्या मागे बसलो त्याचा राजकीय सबंध लावू नये. विधानसभेतच काय मतदार संघातील कामांच्या फाईल घेऊन दिल्लीला जायची आपली तयारी आहे. विविध विकासाची कामं ती पूर्ण करायची म्हटल्यावर सरकारकडे जाव लागतं. सत्ताधारी माणसांना भेटल्यावर त्यांच्याजवळ बसल्यावर राजकीय संबंध जोडू नये, असा सुर जरी आ. बबनदादांनी काढला असला तरी जिल्ह्यात व राज्यात दोन्ही बंधुच्या बसण्याने राजकारण ढवळुन निघालंय हे नक्की.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Behind #Sanjaymama #Ajitdad #Babandada #DevendraFadnavis #SanjayShinde #BabanraoShinde #Convention #Political #madha #kuduwadi, #संजयमामा #अजितदादा #मागे #बबनदादा #फडणविस #संजयशिंदे #बबनरावशिंदे #अधिवेशन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article SilverMace अकलूजला होणार ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा
Next Article Bike accident सावळेश्वर येथे दुचाकीचा अपघात; तरुण पुतण्या ठार, चुलता जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?