Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार, राऊतांचे तिखट प्रतिक्रिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार, राऊतांचे तिखट प्रतिक्रिया

Surajya Digital
Last updated: 2022/10/17 at 5:53 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे आपला अर्ज आज मागे घेतील. काल राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहित ही पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यावर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांचे आभार मानले. Raj Thackeray thanked Fadnavis, Raut’s sharp reaction Andheri by-election

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ राज ठाकरेंचं पत्र हे भाजपच्या स्क्रिप्टचा भाग- राऊत

मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात घोषणा आज भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यानंतर भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व् विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.  राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. काल राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय परंपरेचं पालन करत अंधेरी येथील पोटनिवडणूक निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी नमूद केले आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. परंतु पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे आणि यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरेंनी पत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे “काल केलेल्या विनंतीली मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार. चांगली, सकारात्मक संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून आम्ही कायमच करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,”

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

अर्ज माघारीनंतर मुरजी पटेलांचे समर्थक नाराज पसरली आहे. भाजपने अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज माघार घेण्याची घोषणा केली आहे. यावरुन मुरजी पटेलांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांनी राज ठाकरे व भाजपच्या नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या नेत्यांच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

आज सकाळी पुन्हा भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले. एका गटाचा आग्रह निवडणूक लढण्याचा होता. तर दुसऱ्या गटाचं मत निवडणूक न लढण्याचं होतं. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे निवडणूक लढण्याच्या मताचे होते. मात्र, तरीही पक्षाने ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या या निर्णयानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आपल्यावर कोणताही दबाव नाही. आपण निराश नाही. पक्षाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असं सांगतानाच ऋतुजा लटके यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असं मुरजी पटेल म्हणाले.

□ राज ठाकरेंचं पत्र हे भाजपच्या स्क्रिप्टचा भाग- राऊत

 

 

संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चाच भाग आहे, असं राऊत म्हणाले. तसेच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता. त्यामुळंच भाजपनं उमेदवार मागे घेतला, असंही ते म्हणाले. मुंबई सत्र न्यायालय परिसरात ते आले होते तेव्हा ते बोलत होते.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #RajThackeray #thanked #DevendraFadnavis #Fadnavis #sanjayRaut's #sharp #reaction #Andheri by-election, #राजठाकरे #मानले #देवेंद्रफडणवीस #आभार #संजयराऊत #तिखट #प्रतिक्रिया #अंधेरी #पोटनिवडणूक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मार्कंडेय सहकारी रूग्णालयाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व
Next Article सोलापूर । सुनिल नगरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?