Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कशासाठी ? ठाकरे सरकार पाडण्यासाठी, फडणवीसांसोबत दोन वर्षात दीडशे बैठका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कशासाठी ? ठाकरे सरकार पाडण्यासाठी, फडणवीसांसोबत दोन वर्षात दीडशे बैठका

Surajya Digital
Last updated: 2023/03/29 at 9:43 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
● आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उघड केली व्यूहरचनापरंडा : जेव्हा मंत्रिपद मिळाले नाही; तेव्हाच प्रतिज्ञा केली… पुन्हा ‘मातोश्री’ ची पायरी चढणार नाही… सरकार पाडल्याशिवाय गप्पही बसणार नाही… कामाला लागलो… देवेंद्र फडणवीस मदतीला होतेच… त्यांच्या सहकार्याने पहिली बंडखोरी मीच केली… राज्यात महाविकास आघाडी असतानाही धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली… for what To topple the Thackeray government, one and a half hundred meetings with the Fadnavis in two years Health Minister Tanaji Sawant Matoshree step strategy त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढला… फडणवीसांसोबत दोन वर्षात तब्बल दीडशे बैठका घेतल्या… कशासाठी ?… तर ठाकरे सरकार पाडण्यासाठी… ही होती ठाकरे सरकार पाडण्याची व्युव्हरचना. ती आता पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उघड केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या पतनात भाजपचाच हात होता; हे आता उघड झाले आहे.स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● सरकार पाडण्याचे काम चालले दोन वर्षे

● आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उघड केली व्यूहरचना

 

परंडा : जेव्हा मंत्रिपद मिळाले नाही; तेव्हाच प्रतिज्ञा केली… पुन्हा ‘मातोश्री’ ची पायरी चढणार नाही… सरकार पाडल्याशिवाय गप्पही बसणार नाही… कामाला लागलो… देवेंद्र फडणवीस मदतीला होतेच… त्यांच्या सहकार्याने पहिली बंडखोरी मीच केली… राज्यात महाविकास आघाडी असतानाही धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली… for what To topple the Thackeray government, one and a half hundred meetings with the Fadnavis in two years Health Minister Tanaji Sawant Matoshree step strategy त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढला… फडणवीसांसोबत
दोन वर्षात तब्बल दीडशे बैठका घेतल्या… कशासाठी ?… तर ठाकरे सरकार पाडण्यासाठी… ही होती ठाकरे सरकार पाडण्याची व्युव्हरचना. ती आता पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उघड केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या पतनात भाजपचाच हात होता; हे आता उघड झाले आहे.

 

परंडा येथे आयोजित भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धे दरम्यान आयोजित कार्यक्रमात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हा राजकीय गौप्यस्फोट करून सत्तांतर नाट्यामागच्या सस्पेन्स उघड केला आहे. ठाकरे सरकार सत्तेत येण्यापूर्वी राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते.

 

त्यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री होते. जेव्हा सन २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. निवडणुकीत भाजप- सेनेची युती होती. मात्र निवडणूक निकालानंतर ही युती तुटली आणि दोन्ही काँग्रेसच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उध्दव ठाकरे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते.

 

मंत्री सावंत यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले. तेव्हा त्याठिकाणी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आरपीआयचे सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर, अनिल खोचरे, गौतम लटके, रत्नकांत शिंदे, सुरेश डाकवाले आदी उपस्थित होते.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● ‘मातोश्री’ ची पायरी न चढण्याची केली प्रतिज्ञा

 

उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही. त्यामुळे ‘मातोश्री’वर जाऊन ‘त्यांना’ सांगून आलो की मी आता पुन्हा या ‘मातोश्री’ची पायरी चढणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

● सरकार पाडण्याचे काम चालले दोन वर्षे

 

पहिली बंडखोरी यशस्वी झाल्यानंतर सावंत ठाकरे सरकार पाडण्यासाठी कामाला लागले. सलग दोन वर्षे त्यांनी आमदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना समजावून सांगत त्यांचे मतपरिवर्तन केले. याकाळात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या. त्यानंतर सुरत, गुवाहाटी मार्गे ते सरकार पाडले, असा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी यावेळी केला.

○ देवेंद्र फडणवीसांनाही पाडले खोटे

 

ठाकरे सरकार पाडण्यात भाजपचा काहीही संबंध नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी वारंवार सांगितले आहे. मात्र तानाजी सावंत यांच्या गौप्यस्फोटाने फडणवीस यांनाही खोटे पाडले आहे. ठाकरे सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून शिजत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. इतकेच नव्हे तर फडणवीस यांच्या आदेशानेच हे घडत होते, असे सांगत मंत्री सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

○ पहिली बंडखोरी मीच केली

 

दि. ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिली नाही. चांगले काम करूनही डावलले. त्यामुळे संतप्त होऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यासाठी मी आणि सुजितसिंह ठाकूर देवेंद्र फडणवीसांकडे गेला होतो. ही महाराष्ट्रातील माझी पहिली बंडखोरी होती, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

 

 

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #forwhat #topple #Thackeray #government #one #halfhundred #meetings #devendraFadnavis #twoyears #HealthMinister #TanajiSawant #Matoshree #step #strategy, #कशासाठी #ठाकरे #सरकार #पाडण्यासाठी #देवेंद्रफडणवीस #सोबत #दोनवर्षात #दीडशे #बैठका #व्यूहरचना #तानाजीसावंत #मातोश्री #पायरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हेडफोनने केला तरुणांचा घात; रेल्वेच्या अपघातात मृत्यू
Next Article खासदार गिरीश बापट यांचे निधन, निधनाने NCP नेत्याला अश्रू अनावर

Latest News

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Uddhav Thackeray's advice to Danve
उद्धव ठाकरेंचा दानवे यांना सल्ला – “पुन्हा या, पण आपल्या पक्षातूनच या”
राजकारण July 16, 2025
उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव; देवेंद्र फडणवीस यांची चर्चेला उघड दार
राजकारण July 16, 2025
भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?