Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस, शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस, शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र

Surajya Digital
Last updated: 2020/12/20 at 10:20 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी आंदोलनाचा 25वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीतही आपल्या मागण्यांवर ठाम असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारविरोधातील लढा सुरुच आहे. या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मौन सोडले असून मराठीत ट्वीट करुन आवाहन केले आहे.

दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी आतापर्यंत आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या या सर्व शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अखिल भारतीय किसान संघ, समन्वय समितीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मोदी आणि तोमर यांना हिंदीतून लिहिण्यात आलेल्या वेगवेगळ्या पत्रांमध्ये समितीने म्हटलं आहे की, सरकारचा हा गैरसमज आहे की, तिनही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून सुरु ठेवण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* राजकीय पक्षाशी संबंध नाही

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बोलताना शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, विरोधक नव्या कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मोदींना खुलं पत्र लिहिणारी समिती ही त्या 40 शेतकरी संघटनांपैकी एक आहे, जी गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “सत्य हेच आहे की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने राजकीय पक्षांना आपले विचार बदलण्यास भाग पाडलं आहे. अशातच तुम्ही जे आरोप करत आहात, ते अत्यंत चुकीचे आहेत.” तसेच पुढे बोलताना समितीने पत्रात म्हटलं आहे की, “विरोध करणारी कोणतीही शेतकरी संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.”

* ट्रॉली टाइम्स बनला शेतकरी आंदोलनाचा आवाज

सिंघु बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक्टरच्या हजारो ट्रॉल्यांची रांग दिसते. टिकरी बॉर्डरवरही हीच परिस्थिती आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांची मतं आता या हजारो ट्रॉल्यांपर्यंत पोहचण्यासाठी ‘ट्रॉली टाइम्स’ या वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याचा पहिला अंक प्रकाशीत झाला.

प्रत्येक ट्रॉलीपर्यंत आंदोलनाचा उद्देश पोहचला पाहिजे तसेच अशा प्रकारचं वृत्तपत्र सुरु करण्याची कल्पनाही एका ट्रॉलीमध्येच सूचल्यानं या वृत्तपत्राचं नाव ‘ट्रॉली टाइम्स’ असं ठेवण्यात आलंय. सध्या हे वृत्तपत्र आठवड्यातून दोनदा प्रकाशीत करण्यात येणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #शेतकरी #आंदोलनाचा #आज25वादिवस #शेतकऱ्यांचे #पंतप्रधानांना #खुलेपत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्याने सोलापूरला केंद्रीय पथक येणार
Next Article आणखी काही बिबट्यांचा वावर, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?