Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, आमदार चंद्रकांत पाटील पोलिसांकडून ताब्यात; मुक्ताईनगर बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, आमदार चंद्रकांत पाटील पोलिसांकडून ताब्यात; मुक्ताईनगर बंद

admin
Last updated: 2025/07/22 at 5:46 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

जळगाव, 22 जुलै  – इंदूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील करत होते. मात्र, आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर मुक्ताईनगर शहरात बंद पाळण्यात आला.

ही घटना खामखेडा पुलाजवळ मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजता घडली. आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दुपारी दीड वाजता मुक्ताईनगर बंद करण्यात आला आणि दोन वाजेच्या सुमारास शहर संपूर्णपणे बंद झालं.

मुक्ताईनगर तालुक्यातील इंदूर–हैद्राबाद महामार्गाचं काम सुरू असून, शेतजमिनींच्या मोबदल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. याआधीही रविवारी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळीही पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन थांबवलं होतं.

मंगळवारी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरनाड फाट्यावर महामार्गाचं काम बंद पाडलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुष्णत पिंगळे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी कारवाई करावी लागली.

आंदोलनादरम्यान आमदार पाटील यांच्यासह सुमारे ६० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, ज्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून शेतकऱ्यांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अजित पवारांना वाढदिवसाच्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडून शुभेच्छा
Next Article अखेर ३८ दिवसांनंतर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-35बीने केरळहून भरलं उड्डाण

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?