Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Guava farming सोलापूरच्या शेतकऱ्याचा पेरू केरळच्या बाजारात; किलोला 85 रूपये दर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

Guava farming सोलापूरच्या शेतकऱ्याचा पेरू केरळच्या बाजारात; किलोला 85 रूपये दर

Surajya Digital
Last updated: 2022/09/19 at 1:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ व्ही.एन.आर जातीची लागवडस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)दत्तात्रय लबडे ( पेरू उत्पादक शेतकरी, शेटफळ ता.करमाळा )

□ व्ही.एन.आर जातीची लागवड

 

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याचा पेरू केरळ बाजारपेठेत विकला जात असून एक किलोला 85 रूपये दर मिळत आहे. यावर्षी त्यांना दोन एकर पेरूपासून सतरा लाख रूपयांपेक्षा जादा उत्पन्न अपेक्षित आहे. Solapur farmer’s guava in Kerala market; 85 rupees per kg for Peru

 

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतो. करमाळा येथील दत्तात्रय रामदास लबडे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये मध्य प्रदेशातील नर्सरीमधून रोपे आणून दोन एकर व्ही.एन.आर जातीच्या पेरूची लागवड केली आहे. आतापर्यंत त्यांनी भरघोस उत्पादन मिळवत दोन पिके घेतली आहेत. सध्या त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या बागेतील पेरूची काढणी सुरू केली आहे. दोन एकरामध्ये 20 टन पेरूची विक्री करत आतापर्यंत सरासरी सत्तर रूपयाचा दर मिळवत चौदा लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

 

आणखी दहा टनापर्यंत उत्पादन अपेक्षित असून सध्या त्यांच्या पेरूला केरळ येथील बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने ते एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने पेरू केरळ येथील बाजारपेठेत पाठवत आहेत. केरळला सध्या प्रतिकिलो 85 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. या वर्षी त्यांना दोन एकर पेरू पिकापासून तेवीस लाखापेक्षा जादा रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रगतशील बागातदार म्हणून ओळख असलेल्या दत्तात्रेय लबडे यांनी आजपर्यंत आपल्या शेतात ऊस, केळी, कलिंगड, शतावरी याचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सध्या गावातील शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून केळीबरोबरच पेरू पिकाचाही प्रयोग करत आहेत. आतापर्यंत पुणे, मुंबई, दिल्ली बाजारपेठेत या गावातील पेरू पाठवला जात होता. परंतु लबडे यांनी प्रथमच यावर्षी केरळ राज्यांमध्ये आपला पेरू पाठवण्यास सुरुवात केली. त्यांना दरही चांगला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे .

पेरू बागेत केलेल्या योग्य नियोजनामुळे मिलीबगसारख्या रोगांपासून त्यांची बाग दूर ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. फळ खराब होऊ नये म्हणून त्यांनी क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅगचा वापर केला आहे. यामुळे कोणत्याही रोगापासून पेरूचे संरक्षण तर झालेच असून पिकाची गुणवत्ता व दर्जा हे चांगला राखण्यात त्यांना मदत झाली आहे. सध्या त्यांची पेरूशेती या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आपल्या शेतीमध्ये माहितीसाठी आलेल्या इतर शेतकऱ्यांना ते आवर्जून या पिकातील बारकावे समजावून सांगतात.

 

 

“माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये मी पेरूचे पीक घेतले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उत्पादन चांगले मिळूनही माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. यामुळे वेगळे पीक घेण्यात आपण चुकलो तर नाहीना अशी शंका येत होती. मात्र यावर्षी दरही चांगला मिळत असल्याने जादा उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.”

दत्तात्रय लबडे ( पेरू उत्पादक शेतकरी, शेटफळ ता.करमाळा )

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Guavafarming #vnr, #Solapur #farmer's #guava #Kerala #market #85rupees #per #kg #Peru, #व्हीएनआर #सोलापूर #शेतकरी #पेरू #केरळ #बाजार #किलो #85रूपये #दर #पेरूशेती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट । हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; आमदार कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य
Next Article मला कारस्थान करून मुख्यमंत्री पदावरून हटवले; सुशीलकुमार शिंदेंचा स्वपक्षीय नेत्यांवर आरोप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?