Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी आंदोलन ! स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

शेतकरी आंदोलन ! स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत

Surajya Digital
Last updated: 2021/08/15 at 7:24 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. यासाठी लाल किल्ला परिसरात शिपिंग कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे. या कंटेनरच्या भिंतीवर महात्मा गांधी, सरदार पटेल, भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. तर कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.

१५ ऑगस्टला लाल किल्ल्याची जबाबदारी एनएसजी, एसपीजी, पॅरामिलिट्री फोर्सचे जवान आणि दिल्ली पोलिसांच्या हाती आहे. जवळपास ४० हजाराहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

या शिपिंग कंटेनच्या भिंतीवर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, शहीद भगत सिंह आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत. तर कंटेनरच्या दुसऱ्या बाजूला तिरंग्याची प्रतिमा रंगवण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला लक्षात घेऊन ही बंदोबस्ताची तयारी केली आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलनही सुरु आहे. त्यामुळे आंदोलनाची शक्यता पाहता कंटेनरची भिंत उभारण्यात आली आहे.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. काही आंदोलनकर्ते लाल किल्ल्यावर पोहोचले होते. तसेच काही जणांनी लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वजाच्या दुस-या ध्वजस्तंभावर एक धार्मिक झेंडा फडकवला होता. तर काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्याजवळ ड्रोन हल्ला झाल्याचे पाहायला मिळालं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ ड्रोन जप्त केलं होतं. १ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या मागील रोडवर एका वेब सीरिजचं शूटींग सुरु होतं. या शूटींगसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता, असंही सांगितले जातंय. एकूण एक सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Farmers #movement #Wall #shipping #containers #area #backdrop #IndependenceDay, #शेतकरी #आंदोलन #स्वातंत्र्यदिनाच्या #पार्श्वभूमीवर #परिसरात #शिपिंगकंटेनरची #भिंत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमधील सहा तालुक्यात रात्री दहापर्यंत राहणार दुकाने सुरु
Next Article 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 75 ‘वंदे भारत’ रेल्वेची घोषणा; 2024 पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?