Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करू नये; आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करू नये; आदिवासी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

admin
Last updated: 2025/06/10 at 6:45 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 10 जून, (हिं.स.) मेळघाटमधील आदिवासी शेतक-यांना शेतीपासून वंचित करू नये, या एकमेव मागणीसाठी मेळघाटमधील आदिवासी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले होते.

मेळघाटमधील धरमडोह या गावातील आदिवासी शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. मागील अनेक वर्षापासून त्यांनी शासकीय पडीत जमीन कसून ती वाहितीस घेतली. ती जमीन वनविभागाची आहे की महसूल विभागाची, यावर काहीवर्ष वाद सुरू होता. नंतर मात्र वन विभागाने सदर जमिनीला कुंपण घालून शेतकऱ्यांना जमीन पेरणी करू नये, असे पत्र दिले. त्यामुळे धर्म या गावातील नागरिकांना भूमिहीन होण्याची भीती वाटतआहे.

उदरनिर्वाहाचे कुठलेच साधन नसल्याने त्यांचे कुटुंब या शेतीवरत्त अवलंबून आहे. ही शेती जर हातची निघून गेली. तर आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय या शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच एकर शेती आहे. ती शेती मागील ४० वर्षापासून त्यांचे कुटुंब कसून उदरनिर्वाह चालवत आहे.त्यामुळे त्यांना शेतीपासून वंचित करू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदन देतेवेळी नागो बेठेकर, शित्या बेठेकर, ओमप्रकाश आखंडे, सुंदरलाल आखंडे, गिता धिकार, नामज अखंडे, माधुरी बेठेकर, दिनेश बेठेकर, छोटेलाल बेठेकर, बबलू कास्देकर, सतीश धिकार, छबुलाल धिकार, मुत्री धिकार, सुनीता धिकार, बाबूलाल कास्टेकर, भाऊलाल सावलकर, रवींद्र जामुनकर, प्रकाश जामुनकर, रवी जामुनकर, सुनील धोत्रे, प्रेमलाल धोत्रे, अंकित धिकार यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

सहायक वनसंरक्षक वनविभाग परतवाडा यांची २८ मे २०२५ ची नोटीस तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव यांचे पत्र व १ वर्षापूर्वी जिल्हाधिकारी आणि सहायक उपवनसंरक्षक मेळघाट यांनी दिलेले आश्वासन यांचा विचार करून शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित करूनये, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.आहे.

You Might Also Like

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
Next Article ना हिरवा, ना भगवा; पहिले शेतकरी जगवा – सत्यपाल महाराज

Latest News

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन
देश - विदेश June 18, 2025
भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’
देश - विदेश June 18, 2025
बिहार : वीज कोसळून 12 जणांचा मृत्यू
देश - विदेश June 18, 2025
नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?